Ministry Distribution | उद्धव ठाकरे सरकारचा खातेवाटपाचा घोळ मिटेचिना...| ABP Majha
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल महिनाभराने मंत्रिमंडळ विस्तार झाला... आणि आता विस्तारानंतर तीन दिवस उलटूनही ठाकरे सरकारचं खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटपासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच आहे. दोन दिवसांत ५ बैठका झाल्या. मात्र, हा घोळ काही केल्या संपायचं नाव घेत नाही.