एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आचारसंहितेबाबत अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण
मुंबई : निवडणुका नसणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील नेहमीप्रमाणे सर्व कामे करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, असं आचारसंहितेबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.
आचारसंहितेबाबत निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण :
"निवडणुका नसणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील नेहमीप्रमाणे सर्व कामे करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, इथेही कोणत्याही प्रकारचे अशी कामं करु नयेत, ज्यांमुळे मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न होईल. शिवाय, निवडणूक होत असलेल्या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा निवडणूक नसलेल्या क्षेत्रातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद यांमधील पदाधिकाऱ्याने किंवा आमदार, खासदार, मंत्री यांना करता येणार नाही.", असे सविस्तर स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.
आचारसंहितेमुळे कामं रखडतात, अशी तक्रार करत अनेक नेत्यांनी आचारसंहितेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच (बुधवार) राज्याच्या निवडणूक आयुक्तांशी फोनवरुन यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर अखेर निवडणूक आयोगानेच यावर स्पष्टीकरण देत नेत्यांच्या तक्रारीला एकप्रकारे उत्तर दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement