एक्स्प्लोर

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत शपथविधी

रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेत नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. संभाव्य मंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर पोहचण्याचा निरोप देण्यात आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त लाभला आहे. रविवार, 16 जून रोजी सकाळी 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांसह अयोध्येला जाणार असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच हा शपथविधी होण्याची चिन्हं आहेत.
पवारांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, आपण युतीतच लढणार, उद्धव ठाकरेंची शेलकी टीका
रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या वाटेवर असलेले राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेत नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचं म्हटलं जातं. याशिवाय संजय कुटे, परिणय फुके यांनाही विस्तारात स्थान मिळणार असल्याची माहिती आहे. या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हं 1. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) 2. डॉ. संजय कुटे (भाजप) 3. डॉ. अनिल बोंडे (भाजप) 4. अतुल सावे (भाजप) 5. जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) 6. आशिष शेलार (भाजप) तिघा विद्यमान मंत्र्यांना डच्चू मंत्रिमंडळ विस्तारात विद्यमान मंत्र्यापैकी तिघांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्या ठाकूर आणि प्रविण पोटे यांच्यासह आणखी एका मंत्र्याला डच्चू मिळण्याची चिन्हं आहेत. VIDEO | पक्षांतर्गत कलह टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारलं? उपमुख्यमंत्रिपदावर पाणी दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत ही माहिती मिळाली. उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केली. तसेच ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जातं होतं. यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपद सोडत असल्याने आणखी एखादं मंत्रीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यमंत्री पदासाठी राजेश क्षीरसागर, तानाजी सावंत, उदय सामंत यांची नावं आघाडीवर आहेत. तर दादाजी भुसे आणि संजय राठोड यांचीही नावं चर्चेत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करत होते, तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांच्या निवडीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रात्री दोन वाजेपर्यंत चर्चा सुरु होती.

महत्त्वाच्या बातम्या

MNS VS ABVP Clash : विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget