एक्स्प्लोर

ST Workers Strike : एसटी संपाचा तिढा अखेर सुटला! एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावे, हायकोर्टाचे आदेश

ST Workers Strike : एसटी संपाचा तिढा अखेर सुटला असून एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तर, कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू करण्याचे आदेश महामंडळाला दिले आहेत.

ST Workers Strike : जवळपास पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहे. तर, दुसरीकडे  एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्तीवेतन, ग्रॅज्युएटी देण्याचे महामंडळाला हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर एसटी राज्यात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. 

एसटी कामगारांना कामावरून काढू नका. सर्वांना पुन्हा सामावून घ्या, त्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मात्र थेट कामावरून काढून टाकत त्यांच्या जगण्याचं साधन त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका. अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं एसटी महामंडळाला केली आहे. यावर उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करू, असं आश्वासन महामंडळानं दिल्यामुळे आज गुरूवारी सकाळी 10 वाजता यावर पुन्हा सुनावणी करण्यात आली. 

बुधवारी हायकोर्टात सरकारने काय म्हटलं?

एसटी संपाबाबत त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आम्ही जसाच्या तसा स्वीकारला आहे. सेवाजेष्ठतेनुसार, कामगारांना पगारवाढ, बोनस, थकीत वेतनही राज्य सरकारनं सरकारी तिजोरीतून दिलं आहे. मात्र तरीही अद्याप हजारो कर्मचारी संपावर कायम आहेत. ज्यामुळे ग्रामीण भागांत एसटीची सेवा अद्याप विस्कळीतच आहे. हे प्रकरण आम्हाला आणखीन न्यायप्रविष्ठ ठेवायचं नाही, तेव्हा कर्मचाऱ्यांनी आता कामावर परतायला हवं अशी भूमिका एसटी महामंडळानं हायकोर्टात मांडली.

राज्य परिवहन महामंडळ सतत तोट्यात असल्याचा फटका कर्मचाऱ्यांनाही बसत असून एसटी तोट्यात असल्याचं कारण देत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतन वाढ नसल्यानं बिकट परिस्थितीतही महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून पूर्णत्वास नेत नाही. त्यामुळे आता एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात आली होती. यासाठी त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी हे कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
RBI Repo Rate: युद्धामुळे मंदीचं सावट, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला, EMI भरणाऱ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?
युद्धामुळे मंदीचं सावट, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला, EMI भरणाऱ्यांवर काय परिणाम होणार?
Navi Mumbai Bribe Case : नवी मुंबईत शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षाने लाज आणली, 20 हजारांची लाच घेताना राजेंद्र अहिरेंना रंगेहाथ अटक
नवी मुंबईत शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षाने लाज आणली, 20 हजारांची लाच घेताना राजेंद्र अहिरेंना रंगेहाथ अटक

व्हिडीओ

Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या मतांशी सहमत, अजितदादांनी देखील पोटनिवडणूक लढवलीच होती- संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold : अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
गणपतीपुळेच्या समुद्रात LED मारेमारी, मध्यरात्री नौकात उतरले अधिकारी; ऑपरेशन क्लीन-सी मोहीमेत 3 बोटी जप्त
गणपतीपुळेच्या समुद्रात LED मारेमारी, मध्यरात्री नौकात उतरले अधिकारी; ऑपरेशन क्लीन-सी मोहीमेत 3 बोटी जप्त
Share Market :  सेन्सेक्स आणि निफ्टीचं जोरदार कमबॅक, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका दिवसात 17 लाख कोटींची कमाई  
सेन्सेक्स आणि निफ्टीचं जोरदार कमबॅक, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका दिवसात 17 लाख कोटींची कमाई  
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला
शिकाऱ्याचीच 'शिकार' झाली? 'निशस्त्र' गाझा संपवल्यानंतर आता लेबनाॅन, इराणला संपवण्याचा नादात ट्रम्पनंतर नेत्यानाहूंची राजकीय अन् लष्करी कोंडी!
शिकाऱ्याचीच 'शिकार' झाली? 'निशस्त्र' गाझा संपवल्यानंतर आता लेबनाॅन, इराणला संपवण्याचा नादात ट्रम्पनंतर नेत्यानाहूंची राजकीय अन् लष्करी कोंडी!
US-Iran War Ceasefire : ईराण-अमेरिका युद्धविरामात पाकिस्तान नाही, चीन खरा खेळाडू? नेमकं काय घडलं?
ईराण-अमेरिका युद्धविरामात पाकिस्तान नाही, चीन खरा खेळाडू? नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Iran US War Ceasefire Inside Story: सगळी तयारी झालेली, डेडलाईन संपण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांना फोन फिरवला; सगळा प्लॅन बदलला, इराण-अमेरिकेचं युद्ध कसं थांबलं?, Inside Story
सगळी तयारी झालेली, डेडलाईन संपण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांना फोन फिरवला; सगळा प्लॅन बदलला, इराण-अमेरिकेचं युद्ध कसं थांबलं?, Inside Story
Embed widget