एक्स्प्लोर

एसटी कर्मचारी संप: मंत्रालयाच्या प्रांगणात आंदोलनाचा भाजपचा इशारा

ST workers strike : थकित वेतन, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण, वेतन व इतर मुद्यांवरून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनात आता भाजपने उडी घेतली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी  मुलांबाळांसह मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसतील असा इशारा पडळकरांनी दिला आहे.  

थकित वेतन, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी आगार बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे. त्यात आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांसह मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पडळकर यांनी म्हटले की,  येत्या 10 नोव्हेंबर रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह मंत्रालयाच्या प्रांगणात एकत्र यावे. त्या ठिकाणी उघड्यावर संसार मांडू आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. 

195 आगारातून वाहतूक सुरू

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजही सुरू आहे. राज्यातील 250 पैकी 55 आगार बंद असून 195 आगारातून वाहतूक सुरू आहे. काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. गेवराई आगारातील कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केले. 

...तर एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका; राज ठाकरे यांचा इशारा

वेतन व इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील काही ठिकाणचे एसटी आगार बंद आहेत. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. या संपकरी, आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत एक पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्यास त्यांच्यातील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा पत्रातून दिला आहे. एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget