एक्स्प्लोर

Raj Thackeray | दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं : राज ठाकरे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं, निर्बंधांच्या काळातील वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशा अनेक सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्या आहेत. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मिशन ब्रेक द चेन, अनिल देशमुख राजीनामा यासह विविध विषयांवर भाष्य केलं.

मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं, निर्बंधांच्या काळातील वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशा अनेक सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्या आहेत. राज ठाकरे यांनी सोमवारी (5 एप्रिल) मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांना केलेल्या सूचनांची माहिती दिली.  राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मिशन ब्रेक द चेन, अनिल देशमुख राजीनामा यासह विविध विषयांवर भाष्य केलं.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या सूचनांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून. सूचना योग्य असून मंत्रिमंडळाशी चर्चा करुन उपाययोजना करु, असं त्यांनी म्हटलं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांनी केलेल्या सूचना

उत्पादन : छोट्या व्यापाऱ्यांना उत्पादन करण्यास सांगितलं मात्र विक्री करण्यास मनाई केली. अशा व्यापाऱ्यांसाठी आठवड्यांतून दोन किंवा तीन वेळा दुकानं खुली ठेवण्यास परवानगी दिली.

बँक : लोकांकडे पैसे असतील तर त्यांना बँकांकडे जातील. सरकारने बँकांशी बोलून घ्यावं. बँक सक्तीने पैसे वसूल करत आहेत. नियमावली ३० एप्रिलपर्यंत आहे तोपर्यंत 

वीज बिल माफ करणे : व्यायसायिकांना वीज बिल माफी द्यावी, लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. निर्बंधांच्या काळातील वीज बिल सरकारने माफ करावं

कंत्राटी कामगार : अनेक कंत्राटी कामगार सरकारने घेतलं होतं. या कामगारांना परत बोलवा, त्यांना महापालिकेत कायमस्वरुपी घ्यावं. कंत्राटी कामगारांच्या विषयाकडे लक्ष द्यावं.

मनोरंजन क्षेत्र, सलून यांनाही आठवड्यातून दोन-तीन वेळा दुकानं सुरु करण्यास परवानगी द्यावी. 

क्रीडा क्षेत्र : सराव करणाऱ्या सर्व खेळांडूना परवानगी मिळणं आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, परंतु सराव करायला मंजुरी मिळावी.

शेतकरी : राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. एकदा शेतकरी कोसळला तर पुन्हा संकट आपल्यावर येईल.

शाळा : शाळा बंद आहे, तरी फी आकारणं सुरुच आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे.दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा. 

अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता : राज ठाकरे
सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याविषयी विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, "माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. तर कोणाच्या सांगण्यावरुन मुकेश अंबानींच्या घरासमोर पोलिसांनी जिलेटिनची गाडी ठेवली हा मूळ विषय. त्याची चौकशी होणार आहे का? कोणीतरी सांगितल्याशिवाय पोलीस असं कृत्य करणार नाही. चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण ही गाडी कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी."

बदलीनंतर परमबीर सिंहांना 100 कोटींचा साक्षात्कार? राज ठाकरेंचा सवाल
अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्याविषयी राज ठाकरे म्हणाले की, "परमबीर सिंह यांना 100 कोटींचा साक्षात्कार त्यांच्या बदलीनंतर का झाला? बदली झाली नसती तर हा साक्षात्कार झाला नसता का? पण ते बोलले बारमधून पैसे गोळा करा, हे लांच्छनास्पद आहे. बदल्यांचे बाजार होतातच."

 

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget