मुंबई : मुंबई-पुण्यातील वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी एक विशिष्ट रोड तयार करण्यात येणार असून या मार्गासाठी 6 हजार कोटी खर्च केले जाणार आहे. सुरत-अहमदनगर-सोलापूर असा हा महामार्ग असणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यावेळी महाराष्ट्रात सुरु असलेल्या अनेक प्रोजक्टबद्दल माहिती दिली.


केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ही कामे वेगाने व्हावीत, यासाठी भूसंपादन व इतर परवाने देण्याची कार्यवाही अधिक वेगाने व्हावीत. तसेच वन विभागाच्या परवान्यांसाठी कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा. राज्यात केंद्र शासनाच्या वार्षिक आराखड्यानुसार 2 हजार 727 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आणखी 5 हजार 801 कोटी रुपयांची कामे राज्यात होणार आहेत. राज्यात बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातील अडचणी दूर करावेत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.


राज्यात 523 प्रोजेक्ट सुरू : गडकरी
मुख्यमंत्र्यासोबत जी कामं सुरु आहेत, त्याबद्दल चर्चा झाली असून अनेक अडचणी होत्या त्या दूर झाल्या आहेत. सध्या 523 प्रोजेक्ट महाराष्ट्रात सुरू आहेत. यापैकी 194 प्रोजेक्ट पूर्ण झालेत. तर 305 प्रोजेक्टचं काम सुरू आहे. महाराष्ट्राकरीता 5 हजार कोटी मंजूर करण्यात आलेत. 2600 कोटी मंत्रालयाने मंजूर केले आहेत. मुंबई-पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी एक विशिष्ट रोड तयार करण्यात आला आहे. या मार्गासाठी 6 हजार कोटी खर्च करणार आहे. सुरत-अहमदनगर-सोलापूर असा हा महामार्ग असणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. तर पुणे चांदणी चौकाबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. एक वर्षाच्या आत मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल. 75% काम पूर्ण झाले आहे. मुंबई गोव्यासाठी 180 किमी पूर्ण झाले आहे.


राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडचणी तातडीने दूर कराव्यात : मुख्यमंत्री
राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या व वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे केली.