एक्स्प्लोर
मध्य रेल्वेवर पुलाच्या कामासाठी विशेष मेगाब्लॉक
![मध्य रेल्वेवर पुलाच्या कामासाठी विशेष मेगाब्लॉक Special Megablock On Central Railway To Work Of Bridge On Saturday मध्य रेल्वेवर पुलाच्या कामासाठी विशेष मेगाब्लॉक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/10222424/local-train-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मध्य रेल्वेवर भायखळा येथील पुलाच्या तांत्रिक कामासाठी मेनलाईनच्या सॅण्डहर्स्ट रोड आणि करीरोड स्थानकांदरम्यान चारही मार्गावर शनिवारी रात्री 11.40 ते पहाटे 5.50 या दरम्यान विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते परळ दरम्यान डाऊन दिशेने सुटणाऱ्या स्लो लोकल सकाळी 11.30 ते पहाटे 5.46 पर्यंत डाऊन जलद मार्गाने चालवण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
रात्री 11.26 ते पहाटे 5.46 दरम्यान परळ ते सीएसटी अप स्लो मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे यावेळेत कुर्ला, ठाणे या गाड्या रद्द होतील, तर सीएसटीहून पहाटे 5 वाजता सुटणारी कसारा डाऊन लोकल दादरपर्यंत चालवण्यात येईल.
सीएसटीहून पहाटे 5.12 वाजता सुटणारी आसनगाव लोकल विद्याविहारपर्यंतच चालवण्यात येईल. रात्री 10.15 खोपोली, 10.35 कसारा आणि 11.05 बदलापूर या अप लोकल दादरपर्यंतच धावतील. मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करीरोड दरम्यान लोकल सेवा बंद असेल.
या डाऊन लोकल रद्द
सीएसटी-कुर्ला रा.11.25 वा.
सीएसटी-ठाणे रा.12.34 वा.
या अप लोकल रद्द
कुर्ला-सीएसटी प.5.42 वा.
कुर्ला-सीएसटी प.5.42 वा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)