एक्स्प्लोर

वडील आठ वर्षांपासून बेघर, बोभाटा होताच मुलाला अद्दल

मुंबईतील 72 वर्षीय शंकर वाघमारे यांना त्यांच्या मुलाने घराबाहेर काढलं. त्याला त्याची चूक समजावी म्हणून भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी होर्डिंग लावलं आणि अखेरीस मुलाने वडिलांना घरी घेऊन जायची तयारी दर्शवली.

मुंबई : स्वतःच्या वडिलांची जबाबदारी न घेणाऱ्या मुलाला चांगलीच अद्दल घडवण्यात आली. मुंबईतील 72 वर्षीय शंकर वाघमारे यांना त्यांच्या मुलाने घराबाहेर काढलं. त्याला त्याची चूक समजावी म्हणून भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी होर्डिंग लावलं आणि अखेरीस मुलाने वडिलांना घरी घेऊन जायची तयारी दर्शवली. शंकर वाघमारे, वय वर्ष 72.. मुंबईतील वर्सोवा मंदिरात एकटेच बसलेले.. स्वतःशीच बोलत असतात.. व्यवसायाने ते चित्रकार आहेत. आठ वर्षांपूर्वी शंकर यांना विकास या त्यांच्याच पोटच्या पोराने घराबाहेर काढलं. घरातून बाहेर काढल्यानंतर बेघर झालेले शंकर वाघमारे राहण्यासाठी मंदिरात गेले. या काळात ते नातेवाईकांसह विविध ठिकाणी राहिले. शंकर वाघमारे काही दिवसांपूर्वी भाजप आमदार भारती लव्हेकर यांच्या संपर्कात आले. भारती लव्हेकर यांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन एक वेगळीच शक्कल लढवली. शंकर वाघमारे यांच्या मुलाला पश्चात्ताप व्हावा म्हणून त्यांनी होर्डिंग लावलं. या संपूर्ण प्रकरणाबाबत शंकर वाघमारे यांच्या मुलाशी एबीपी माझाने संपर्क साधला. वडिलांशी बोलणं झालं असून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणार आहे. मात्र हे होर्डिंग लावायला नको होतं, अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली. समाजात बोभाटा झाला म्हणून शंकर वाघमारे यांच्या मुलाने बापाची जबाबदारी स्वीकारली. देशात आणि राज्यात असे कित्येक शंकर वाघमारे आहेत, ज्यांना पोटच्या लेकराने घराबाहेर काढलं आहे. मात्र जन्मदात्यांना घराबाहेर काढणाऱ्यांना समाजानेच अद्दल शिकवणं गरजेचं आहे, हे या प्रकरणातून सिद्ध झालं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 45 गॅस सिलेंडरसह 3 दुचाकी जप्त, पवई पोलिसांची मोठी कारवाई 
गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 45 गॅस सिलेंडरसह 3 दुचाकी जप्त, पवई पोलिसांची मोठी कारवाई 
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या
मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget