मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी नाट्य काही संपण्याचं नाव घेत नाही. आता मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांची नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी नियोजन करणार्या विविध प्राधिकरणांऐवजी मुंबई महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करावं अशी चहल यांनी भूमिका मांडली आहे. या भूमीकेवर महाविकास आघाडीतील मंत्री आहे.
मुंबई महापालिकेचे बजेट सादर करताना महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी एका प्राधिकरणाच्या प्रस्ताव दिल्याचे नमूद केले. मुंबईत म्हाडा, SRA, MMRDA अशी विविध नियोजन प्राधिकरणे आहेत. या प्राधिकरणाची जबाबदारी देखील विविध पक्षात वाटून दिली आहे, असं असताना महाविकास आघाडी सरकारला विचारात न घेता आयुक्तांनी प्रस्ताव दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना याबाबत तिन्ही पक्षांमध्य चर्चा अपेक्षित असते. पण तसे न होता थेट मुंबई अर्थसंकल्पात हा उल्लेख आल्याने काही मंत्र्यांनी यावर नाराज आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पातील विशेष तरतुदी :
- कोविड आरोग्य विषयक संसाधनांसाठी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी 15.90 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हँड सॅनिटायझर, साबण, हँड वॉश पुरवले जाणार आहेत.
- उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर काउन्सिलिंग कार्यक्रम Whatsapp आणि Chat bot द्वारे राबवणार. वैय्यक्तिक मार्गदर्शनासाठी मे 2021 पासून 'करिअर टेन लॅब' या संस्थेमार्फत नियोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रीया पार पाडण्याकरता मार्गदर्शन केलं जाईल. यासाठी तब्बल 21.10 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
- CBSC बोर्डाच्या 2 शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. आता मुंबई शहरात 2, पश्चिम उपनगरांत 3, पूर्व उपनगरांत 5, अशा मिळून 10 शाळा, ज्युनियर केजी ते 6वी पर्यंत सुरु होतील. त्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- मुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 27 शालेय वस्तूंसाठी 88 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- 25 माध्यमिक शाळांमध्ये टिकरिंग लॅब, विचारशील प्रयोगशाळा सुरु होणार. यात विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक साहित्याची मांडणी करुन प्रयोग करु शकतील. यासाठी 5.30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- संगीततज्ज्ञ मयुरेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एम. जोशी मार्गमहापालिका शाळेत "मॉडेल संगीत केंद्र" उभारणार. यात स्मार्ट टिव्ही, प्रोजेक्टर, क्रोम कास्ट, वायफाय या सेवा पुरवल्या जातील, त्यासाठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- महापालिका शाळेतील 1300 वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम होणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात 28.58 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :