एक्स्प्लोर

सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मुलीलाच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ

समाज कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी दयानंद मेश्राम यांच्या मुलांची नावंही ही या यादीत आढळतात.

मुंबई : एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतकऱ्यांनी कर्जमाफी नाकारावी यासाठी आवाहन करत असताना राज्यातील भाजप मंत्री आणि शासकीय अधिकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात शिकण्यासाठी मिळाल्याची बाब एका शासन निर्णयामार्फत समोर आली आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागाने तयार केली आहे. गेली अनेक वर्षे गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे. मात्र याच खात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोले हिला अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रॉफीजिक्स या विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठमध्ये 3 वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे. मंत्री असताना, आर्थिक स्थिती चांगली असताना स्वतःच्याच खात्यामधील सुविधेचा कसा लाभ घेतला जातो हे या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. यामुळे खऱ्या गरजू विद्यार्थ्यांना संधी मिळत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. समाज कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी दयानंद मेश्राम यांच्या मुलांची नावंही ही या यादीत आढळतात. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठीचे  निकष :
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे आणि तो नोकरी करत असल्यास सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थ्यांना राज्य किंवा केंद्र सरकारची शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.
  • लाभार्थीचं वय कमाल 35 वर्षे आणि पीएचडीसाठी 40 वर्षे असावं.
  • पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण आवश्यक.
  • शिष्यवृत्तीनंतर लाभार्थी देशाची सेवा करेल, या अनुषंगाने हमीपत्र लिहून द्यावे.
मंत्र्यांना किती पगार मिळतो? काही महिन्यांपूर्वीच मंत्री आणि आमदारांच्या वेदन भत्त्यात भरीव घसघशीत वाढ करणारं विधेयक विधानसभेत मंजूर झालं. हे विधेयक मंजूर झाल्यानं मंत्र्यांना मुख्य सचिवांप्रमाणे वेतन मिळण्यास सुरुवात झाली आहे. तर राज्यमंत्र्यांना अतिरिक्त मुख्य सचिवांप्रमाणे वेतन मिळतं. तसेच  तर आमदारांना प्रधान सचिवांप्रमाणे वेतन-भत्ते मिळण्यास सुरुवात झाली. आमदार – प्रधान सचिव 1 लाख 60 हजार ते 1 लाख 70 हजार एवढं वेतन मिळत. आता नव्या विधेयकानुसार आमदारांना इतकं वेतन मिळतं. राज्यमंत्री – अतिरिक्त मुख्य सचिवांना सध्या 1 लाख 79 हजार ते 1 लाख 99 हजार एवढं वेतन मिळत. आता नव्या विधेयकानुसार राज्यमंत्र्यांना इतकं वेतन मिळतं. कॅबिनेट मंत्री – मुख्य सचिवांना 1 लाख 80 हजार ते 2 लाख एवढं वेतन मिळतं. आता नव्या विधेयकानुसार कॅबिनेट मंत्र्यांना एवढं वेतन मिळतं.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget