एक्स्प्लोर
वसई रेल्वे स्थानकात गटाराची स्लॅब कोसळून 15 प्रवासी जखमी
वसई : वसई स्थानकावर प्रवाशांच्या भारामुळे गटाराची स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅब कोसळून 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. वसई रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ ही घटना घडली.
पश्चिम रेल्वेवर लोअर परळ स्थानकाजवळ यार्डात जाणारा एक्स्प्रेस ट्रेनचा डबा घसरल्यामुळे विरारकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रेन लेट झाल्यामुळे स्टेशनवर गर्दी वाढली आणि अनेक प्रवासी त्या गटारावरील स्लॅबवर उभे राहिले होते.
गाडीची वाट पाहत प्रवासी गटाराच्या स्लॅबवर उभे असताना अशाचप्रकारे भारामुळे हा स्लॅब कोसळला. गटाराचा स्लॅब खाली पडल्यामुळे 15 प्रवासी जखमी झाले आहेत.
संबंधित बातम्या :
लोअर परळजवळ एक्सप्रेसचा डबा घसरला, प. रेल्वेची वाहतूक विस्कळीत
भाजपच्या महिला खासदार गटारात कोसळल्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement