एक्स्प्लोर

1 किमीसाठी 500 रुपये, टॅक्सीचालकाकडून सिंगापूरच्या पर्यटकाची लूट

मुंबई : 'अतिथी देवो भव' अशी शिकवण असलेल्या भारतीय संस्कृतीत पाहुण्यांना आदराचं स्थान आहे. अतुल्य भारत अभियाना अंतर्गत परदेशी पर्यटकांना न फसवण्याबाबत जाहिरात करुनही देशातील काही टॅक्सीचालक, गाईड्स, एजंट्स आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीयांची मान शरमेनं खाली झुकवत आहेत.   सिंगापूरहून भारतात आलेल्या रेमंड येओ या पर्यटकाची फसवणूक 'कॅच न्यूज'ने मांडली आहे. रेमंडने वर्षभरापूर्वी पंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. संबंधित चालकाचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि टॅक्सी परमिट महिन्याभरासाठी रद्द करण्यात आलं.   कशी केली फसवणूक ? गेल्या वर्षी 11 एप्रिलला सिंगापूरचा नागरिक असलेला येओ मुंबईत होता. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 ला जाण्यासाठी त्याने त्याच्या पंचतारांकित हॉटेलजवळ टॅक्सी पकडली. हॉटेल ते विमानतळ हे अंतर केवळ एक किलोमीटर असूनही त्यासाठी 200 रुपये निश्चित करण्यात आले.   ही लूट इतक्यावर थांबली नाही. विमानतळावर उतरल्यानंतर जमिल अहमद खान नावाच्या टॅक्सीचालकाने येओकडे 500 रुपयांची मागणी केली. सामानाचं वजन अधिक असल्याचं कारण देत त्याने एक किलोमीटर अंतरासाठी ही अवाजवी मागणी केली.   पंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीत येओने मीटरनुसार भाडे घेण्यास दिलेला नकार आणि इच्छित स्थळी नेल्यानंतर केलेली अवाजवी मागणी यांचा उल्लेख केला आहे. ही भारतासाठी शरमेची बाब आहे, अशा टॅक्सीचालकांचा बंदोबस्त करा, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही त्याने दिली.   पीएमओने महाराष्ट्राच्या परिवहन विभागाला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. यावर्षी 28 मार्चला म्हणजे तब्बल वर्षभरानंतर पत्र मिळाल्यावर टॅक्सीचालकाचा शोध सुरु झाला. 6 एप्रिलला जमिल अहमद खानची चौकशी करण्यात आली. अखेर त्याने आपल्यावरील आरोपांची कबुली दिली. त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि टॅक्सी परमिट महिन्याभरासाठी रद्द करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

High Court on Alimony: पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Sonam Wangchuk Protest Marathi News मोठी बातमी: सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget