चेंगराचेंगरीत कांजूरमार्ग येथील दोन मैत्रिणींना आपला जीव गमवावा लागला. कंजूरमार्गच्या मिराशी नगरमध्ये राहणाऱ्या शुभलता शेट्टी आणि नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या सुजाता शेट्टी या दोघींची चांगली मैत्री होती. दोघी मूळच्या कर्नाटकच्या आहेत. सणाच्या निमित्ताने दोघी फुलांची खरेदी करण्यासाठी एकत्र जात असत.
शुभलता शेट्टी आणि सुजाता शेट्टी दसऱ्याच्या निमित्ताने फुलं आणण्यासाठी एकत्र परेलला गेल्या होत्या. मात्र फुलं खरेदी करुन परतताना एल्फिन्स्टनच्या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि यातच दोघींचाही मृत्यू झाला.
एल्फिन्स्टन-परेलला गर्दी का होते?
परेल आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत.
उद्या दसरा असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी दादर आणि परिसरात जातात. सकाळच्या वेळेत असलेली गर्दी आणि त्यातच दोन्ही मार्गांवर लोकल आल्यास अचानक उडणारी झुंबड नेहमीची आहे. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे.
प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो, अशी ओरड नेहमीच प्रवाशांकडून होते. त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिलं गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मृतांविषयी हळहळ व्यक्त केली जात असतानाच या अपघातासाठी प्रशासनाला जबाबदार ठरवलं जात आहे.
एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना हेल्पलाईन नंबर आणि आवाहन
हेल्पलाईन –
24136051
24107020
24131419
संबंधित बातम्या :