एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीची घटना अतिशय धक्कादायक : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2017 06:08 PM (IST)
'रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र सरकार या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करेल. याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.'
मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा आपले प्राण हकनाक गमवावे लागले. या दुर्घटनेनंतर प्रशासनावर चहूबाजूनं टीका सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणी एबीपी माझाशी फोनवरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘या दुर्घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासन नक्कीच प्रयत्न करेल.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया : VIDEO : संबंधित बातम्या : बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या! एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं? एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?