एक्स्प्लोर

पालघर पोटनिवडणूक : शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांना उमेदवारी : सूत्र

शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवर शिवसेना-भाजपमध्ये संर्घष पेटण्याची चिन्हं आहेत. कारण शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्याच (मंगळवार) श्रीनिवास वनगा आपला अर्ज देखील भरणार आहेत. फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना अज्ञातस्थळी ठेवलं आहे. दरम्यान, भाजपनं वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत चिंतामण वनगा यांची पत्नी जयश्री, मुलगा श्रीनिवास आणि प्रफुल्ल यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला होता. पूर्वीपासून हा मतदारसंघ भाजपकडे होता. येत्या 28 मे रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. दरम्यान पालघर पोटनिवडणुकीसंदर्भात सकाळपासून 'मातोश्री'वर खलबतं सुरु होती. प्रत्येक पदाधिकारी, आमदार आणि खासदाराला पोटनिवडणुकीची विभागवार जबाबदारी देण्यात आली होती. वनगा कुटुंबीयांचा भाजपला रामराम चिंतामण वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबीयांनी केला होता. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली. मात्र ती देण्यात न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर चिंतामण वनगांच्या पत्नी आणि मुलाने 3 मे रोजी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेशही केला. भाजपकडून मन वळवण्याचा प्रयत्न वनगा कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांशी सहमत नसल्याचं पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी सांगितलं. वनगांसोबत अनेक वर्षं काम केलं, आम्ही एकाच गुरुचे शिष्य आहोत. अनेकवेळा पराभवानंतरही आम्ही पक्षाचं काम सोडलं नाही, असंही सावरा म्हणाले होते. वनगांच्या मुलाला निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र अद्याप त्या ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी त्याला उमेदवारी द्यायची नाही असा निर्णयच झाला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. वनगा कुटुंबाला उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न पालघर पोटनिवडणुकीसाठी चिंतामण वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी द्या, अशी मागणी पालघरमधील शिवसैनिकांनी केली होती. शिवसेनेकडून श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास, आम्ही सर्वतोपरी मेहनत करुन, त्यांना निवडून आणू, असा विश्वास शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिला होता. त्यानंतर चिंतामण वनगांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. 28 मे रोजी पोटनिवडणूक पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. संबंधित बातम्या : वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश  पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन  पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर  

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget