एक्स्प्लोर

समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्यास श्रीहरी अणेंचा विरोध

समृद्धी महामार्ग हे नाव वाईट आहे काय? असा सवाल श्रीहरी अणे यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या एकाही नेत्याने विदर्भातील काहीही केलेलं नाही. या एका कारणासाठी तरी शिवसेनेच्या नेत्याचं नाव समृद्धी महामार्गाला नको, असं श्रीहरी अणे म्हणाले.

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरुन शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या वादात माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी उडी घेतली आहे. श्रीहरी हरे यांनी समृद्धी महामार्गाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास कडाडून विरोध केला आहे.

समृद्धी महामार्ग हे नाव वाईट आहे काय? असा सवाल श्रीहरी अणे यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या एकाही नेत्याने विदर्भातील काहीही केलेलं नाही. या एका कारणासाठी तरी शिवसेनेच्या नेत्याचं नाव समृद्धी महामार्गाला नको, असं श्रीहरी अणे म्हणाले. श्रीहरी अणे यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून शिवसेनेच्या मागणीला विरोध केला आहे.

शिवसेना नेत्यांची नावं मुंबई, पुण्यात शोभतील. हिम्मत असेल तर सदाशिव पेठेला 'ठाकरे पेठ' नाव द्यावं, असंही श्रीहरी अणे म्हणाले.

विदर्भातील महामार्गाचं नाव समृद्धी महामार्ग योग्य आहे. नाव बदलायचंच असेल तर 'विदर्भ' महामार्ग करा. व्यक्ती विशेष नावे हवी असतील तर विदर्भ कर्मभूमी असलेल्या महात्मा गांधी यांचं नाव समृद्धी महामार्गाला द्या, अशी मागणी श्रीहरी अणे यांनी केली.

शिवसेना भाजप आमने-सामने

समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं, यावरुन भाजप-शिवसेना आमनेसामने आले आहेत. महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं यासाठी मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत यासंदर्भात निवेदन दिलं.

समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभाग ( विशेष प्रकल्प ) करत असून या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याबाबत शिंदे आग्रही आहेत.

दुसरीकडे, समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु आहेत. त्यामुळे मुंबई आणि मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला कोणत्या पक्षाने सुचवलेलं नाव लागणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या

समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव की वाजपेयींचं?

महत्त्वाच्या बातम्या

Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, तर कांदिवलीमध्ये विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
धक्कादायक! नालासोपारात पाण्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, तर कांदिवलीमध्ये विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन

Embed widget