एक्स्प्लोर

फेसबुकवरुन अंडरवर्ल्डमध्ये शूटर्सची भरती

फहीम मचमच हा दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आहे. दाऊद भारतातून पळाल्यानंतर भारतातील वसुली मचमच सांभाळतो.

मुंबई : आयसिससारख्या दहशतवादी संघटनाच नव्हे, तर मुंबईतील अंडरवर्ल्डसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून शूटर्सची भरती करत आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पंजाबमधून येणाऱ्या शूटर्सला अटक केली आहे. जगबीर सिंह असे या शूटर्सचे नाव आहे. दाऊदचा निकटवर्तीय फहीम मचमचच्या सांगण्यावरुन जगबीर मुंबईत एकाची हत्या करण्यासाठी आला होता.       बदलत्या काळानुसार अंडरवर्ल्डमधील काम करण्याच्या पद्धतीही बदलू लागल्या आहेत. आयसिस, जैश ए मोहम्मद किंवा लष्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी संघटनाच नव्हे, तर मुंबईतील अंडरवर्ल्डसुद्धा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या गुंडांची आणि शूटर्सची भरती करत आहे. पंजाबमधून आलेल्या 22 वर्षीय जगबीर सिंह या तरुणाला क्राईम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याच्या चौकशीत मोठी माहिती समोर आली. जगबीरला फेसबुकवर फहीम मचमच नावाच्या व्यक्तीने दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये समाविष्ट करण्याचं आणि गँगस्टर बनण्याचं स्वप्न दाखवलं. मुंबईतील एका सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करण्यासाठी जगबीर अमृतसरहून मुंबईत आला होता. पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले आहे की, फहीम मचमच नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर 8 जणांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली होती. यामध्ये जगबीर नावाचा हा तरुण फहीमच्या जाळ्यात अडकला. जगबीर पाचवी नापास असून, बेरोजगार आहे. सोशल मीडियावरुन ब्रेन वॉश करुन, जगबीरला हत्या करण्यासाठी मुंबईत पाठवण्यात आले. फहीम मचमच हा दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आहे. दाऊद भारतातून पळाल्यानंतर भारतातील वसुली मचमच सांभाळतो. मुंबईतील उद्योगपती, बिल्डर यांच्याकडून वसुलीची कामं ही गँग करते. वांद्र्यातील सामाजिक कार्यकर्ता आणि गारमेंट शॉपची मालकीन शबनम शेखकडूनही कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे न मिळाल्याने फहीम मचमचने शूटरच्या मदतीने त्यांना संपवण्याचा कट आखला आणि शूटर्सच्या भरतीसाठी फेसबुकची मदत घेतली, अशी माहिती मुंबई पोलिसांना चौकशीत मिळाली. पोलिसांनी दिल्लीतील हरीश यादव आणि वांद्र्यातील बिलाल शम्शी यांनाही ताब्यात घेतले आहे आणि आता गुरुद्वारात लपलेल्या जगबीरलाही गजाआड केले आहे. दरम्यान, तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांसाठी वापरणाऱ्या फहीम मचमचचा तपास आता मुंबई पोलिस घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...' आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Embed widget