एक्स्प्लोर

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर, एनसीबी महासंचालकांकडून चौकशीचे आदेश

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांची दक्षता समिती नेमण्यात आली. समीर वानखेडे यांची चौकशी करणारी समिती उद्या मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

Sameer Wankhede: आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान याच्याकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. यापैकी 8 कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede)  यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला. प्रभाकर साईल यांच्या आरोपानंतर एकच खळबळ माजली. यातच समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर घालणारी माहिती समोर आली. समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांची दक्षता समिती नेमण्यात आली. समीर वानखेडे यांची चौकशी करणारी समिती उद्या मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर समीर वानखेडे दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. 

दरम्यान, पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात केलेल्या आरोपाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर असल्याचा दावा स्वत: प्रभाकर साईल यांनी केला. दरम्यान, आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर त्याचे वडील शाहरूख खानकडे 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. यातील 8 कोटी समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असाही त्यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे आणि प्रभाकर साईल यांची अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. 

दरम्यान, आर्यन खान प्रकरणात तपासात अडथळे निर्माण करण्याच्या प्रयत्नांना प्रतिबंध करावा या मागणीसाठी संचालक समीर वानखेडेंनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. “माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचा वागलेलो नाही. माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार आहे. तसेच मुंबई पोलीस मला फसवण्यासाठी माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करू शकते. जर मुंबई पोलीस अशाप्रकारचे पाऊल उचलते, तर माझ्याविरोधात कोणतीही कारवाई होऊ नये, असेही समीर वानखेडे यांनी म्हटले होते. याच याचिकेवर सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यासंदर्भात कोणताही आदेश देण्यास सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नकार दिला. दरम्यान, समीर वानखेडे यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू झाली. मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहेत.

संबंधित बातम्या- 

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation: डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
Caste Validity Certificate Online Process: जात वैधता प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकी प्रोसेस काय?, A टू Z माहिती
जात वैधता प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकी प्रोसेस काय?, A टू Z माहिती
Parth Pawar NCP: मोठी बातमी! पार्थ पवार यांनी गेम फिरवला, 5 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघेंची मुंबईच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती; राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना पुन्हा मोठा झटका?
मोठी बातमी! पार्थ पवार यांनी गेम फिरवला, 5 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघेंची मुंबईच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती; राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना पुन्हा मोठा झटका?

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Delimitation Bill Update : मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
मोठी बातमी : लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार, मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
डिलिमिटेशन म्हणजे काय? केंद्रातील एनडीए सरकारकडे किती संख्याबळ, विधेयक मंजुरीसाठी किती आवश्यक?
Sunetra Pawar: कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी ! डिलिमिटेशनची चर्चा, इंडिया आघाडीने बोलावली बैठक; सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, समोर आलं राज'कारण'
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
Embed widget