एक्स्प्लोर
...अन्यथा भाजपसोबत युती कठीण : शिवसेना

मुंबई : भाजपसोबत युती होणार असेल तर ती सर्व महानगरपालिकांमध्ये होईल किंवा सर्व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होईल नाहीतर कठीण आहे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.
राज्यातील आगामी जिल्हा परिषदा तसेच महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीबाबत सध्या कोणताही प्रस्ताव शिवसेनेसमोर नसल्याचंही शिवसेनेने स्पष्ट केलं आहे.
युती होवो अथवा न होवो शिवसेनेने निवडणुकीची पूर्ण तयारी केली असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली.
आगामी काळात राज्यात मिनी विधानसभा समजली जाणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. यात शिवसेना-भाजपची युती होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्यात खासदार अनिल देसाई यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केल्याने भाजप काय निर्णय घेतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
