एक्स्प्लोर

नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीसाठी विधिमंडळात शिवसेनेची धावाधाव

शिवसेनेच्या उमेदवाराला अर्ज भरताना जात पडताळणीचा नियम अडसर ठरत आहे. यासाठी आज या बिलात तरतूद करुन ते बिल पास करुन घेणं शिवसेनेसाठी महत्वाचं होतं.

मुंबई : विधानसभेत जात पडताळणी तरतुदीसंदर्भात बिल काढण्यासाठी आज शिवसेनेची सर्व शक्ती पणाला लागली होती. मात्र कामकाजाच्या गडबडीत बिल काढण्यास विलंब झाल्यामुळे शिवसेनेचे आमदार-मंत्री पक्षाचा व्हीप झुगारुन सभागृहात अनुपस्थित राहिले. मुंबईतील सायन कोळीवड्याच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराला अर्ज भरण्यास उद्या (मंगळवार) शेवटची तारीख आहे. यात शिवसेनेच्या उमेदवाराला अर्ज भरताना जात पडताळणीचा नियम अडसर ठरत आहे. यासाठी आज या बिलात तरतूद करुन ते बिल पास करुन घेणं शिवसेनेसाठी महत्वाचं होतं. तरीही दिवसभराचं कामकाज तहकूब करण्याआधी भाजपचे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ऐन वेळेस बिल काढण्याची आठवण करुन दिली आणि कामकाज सुरु ठेवण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव आणि गिरीश बापट यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. अखेर कामकाज सुरु ठेवण्यात आलं आणि बिल काढण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र विरोधकांनी पुन्हा कोरमचा मुद्दा उपस्थित करुन शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अखेर शिवसेना प्रतोद सुनील प्रभू आणि नेते मिलिंद नार्वेकर यांची आमदार-मंत्र्यांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी फोन करता-करता दमछाक उडाली आणि कसंबसं बिल मंजूर होण्यासाठी कोरम दाखवण्यात आला. त्यामुळे एका पोटनिवडणुकीच्या उमेदवारासाठी अख्ख्या विधिमंडळात शिवसेनेची धावाधाव झाल्याचं चित्र बघायला मिळालं. सूत्रांच्या माहितीनुसार या बिलासाठी स्वतः उद्धव ठाकरे आज शिवालयात तळ ठोकून होते, तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये विशेष लक्ष घातले होते. मात्र यामुळे शिवसेनेचं ढिसाळ फ्लोअर मॅनेजमेंट चव्हाट्यावर आलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DCM एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
पंतप्रधान बारकाईने लक्ष ठेऊन, कुणीही अफवा पसरवू नका; गॅस पुरवठ्यावर DCM एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण
एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
Rupee Record Low : गॅस दरवाढीनंतर आता 'रुपया'च्याही गटांगळ्या, डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर
गॅस दरवाढीनंतर आता 'रुपया'च्याही गटांगळ्या, डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर
Jalgaon Accident: धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना
धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना
Embed widget