एक्स्प्लोर

ठाण्यातील अक्षत मोहितेचा ‘नासा’वारीचा संपूर्ण खर्च शिवसेना उचलणार

भारतातून केवळ 4 मुलांची निवड 'नासा'कडून करण्यात आली आहे, ज्यात अक्षत हा एकमेव मराठी मुलगा आहे.

ठाणे : ठाण्यातील अक्षत मोहिते या अकरावी इयत्तेतील तरुणाच्या सॅक्झीमो (Psaximo) या अंतरीक्ष प्रकल्पाची अमेरीकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या नॅशनल स्पेस सोसायटीने दखल घेतल्यानंतर, अक्षतवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम एबीपी माझाने दिले होते. त्याची दखल घेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अक्षतचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अक्षतच्या प्रकल्प सादरीकरणासाठीच्या अमेरिका वारीसाठीचा संपूर्ण खर्च उचलला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन येथे राहणारा अक्षत सध्या मुलुंड येथील महाविद्यालयात अकरावी सायन्समध्ये शिकतो. शालेय शिक्षण घेत असताना ‘अंतराळ’ विषयावर पार पडलेल्या शास्त्रज्ञांच्या सेमिनारमधील सहभागानंतर संशोधन करून त्याने अंतरीक्ष प्रकल्प बनवला. या प्रकल्पाची थेट नासाने दखल घेतली तसेच, या प्रकल्पाचे सादरीकरण 24 ते 27 मे रोजी अमेरिकेच्या लॉस एंजल्समध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषदेत करण्यासाठी निमंत्रण धाडले. याठिकाणी जगभरातून स्पर्धक येणार असून, भारतातून केवळ 4 मुलांची निवड करण्यात आली आहे, ज्यात अक्षत हा एकमेव मराठी मुलगा आहे. अक्षतच्या या अमेरिका वारीसाठी भरमसाठ खर्च होणार असल्याने त्याच्या पालकांसमोर मोठा पेच उभा राहिला होता. याबाबतचे वृत्त प्रदर्शित होताच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अक्षतचा जाहीर सत्कार केला. तसेच, अक्षतच्या अमेरिकेला जाण्यायेण्यापासूनचा सर्व खर्च आमदार सरनाईक यांनी उचलला आहे. यामुळे अक्षतच्या नासा वारीला मोठे पाठबळ मिळाले आहे. काय आहे प्रकल्प? स्पेसरुपी शहरामध्ये रहिवाशी आणि औद्योगिक क्षेत्र असून यासाठी लागणारी वीज सौर उर्जा आणि मायक्रोव्हेवद्वारे निर्माण केली जाणार आहे. इंधनासाठी दोन इलेक्ट्रोन यांच्या संयोगातून इंधन निर्मिती केली जाणार आहे. हे स्पेस अंतराळात नेण्यासाठीही हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयुगावरील हायड्राजीन या इंधनाचा वापर केला जाणार आहे. तर इंटरनेटसाठी वायफायऐवजी लाईट इंटरनेट म्हणजेच लायफाय हे तंत्र स्पेसमध्ये वापरले जाणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: SRPF कौस्तुभ सांगळेने लोकभवनात स्वत:ला संपवलं; आता धक्कादायक कारण आलं समोर, पोलीसही चक्रावले!
SRPF कौस्तुभ सांगळेने लोकभवनात स्वत:ला संपवलं; आता धक्कादायक कारण आलं समोर, पोलीसही चक्रावले!

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
Embed widget