एक्स्प्लोर

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं मुंबईत निधन झालं असून वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी मोहन रावले यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन रावले हे आतापर्यंत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे 5 वेळा खासदार राहिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात असत. सर्वसामान्यांचे नेते आणि लालबाग-परळ ब्रँड अशी मोहन रावले यांची ओळख होती.

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. मोहन रावले यांच्यावर आज रात्री किंवा उद्या सकाळी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. आज रात्री मोहन रावले यांचं पार्थिव गोव्याहून मुंबईत आणलं जाणार आहे.

लालबाग-परळमधील लोकप्रिय नेते असणाऱ्या मोहन रावले यांची लालबाग-परळ ब्रँड अशी ओळख होती. लालबाग परळमध्ये वाढलेले मोहन रावले हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे. शिवसेनेकडून 5 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. क्रिकेटची आवड असणारे मोहन रावले क्रिकेटमध्ये करिअर करु असणाऱ्यांनाही प्रोत्साहन द्यायचे.  ते क्रिकेटचे सामनेही भरवत असतं.

लालबाग-परळमध्ये पक्षवाढीचं कामही त्यांनी केलं असून या भागांत शिवसेना रुजवण्याच्या कामा मोहन रावले यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी पक्षासाठी मोलाचं योगदान देताना अनेक शिवसैनिकही घडवले. शिवसेनाचा खंदा कार्यकर्ता गेल्यामुळे शिवसेनेत शोककळा पाहायला मिळत आहे.

शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोहन रावले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे की, "मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. "परळ ब्रँड "शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला विनम्र श्रद्धांजली..."

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam: MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
Maharashtra Live News Updates: राजू शेट्टी यांचं ऊस दरासाठी सुरु असलेलं आंदोलन आजही सुरूच; पुणे-बंगळुरू महामार्ग दोन दिवसांपासून बंदच
Maharashtra Live News Updates: राजू शेट्टी यांचं ऊस दरासाठी सुरु असलेलं आंदोलन आजही सुरूच; पुणे-बंगळुरू महामार्ग दोन दिवसांपासून बंदच
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Embed widget