मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray) गेल्या काही दिवसांपासून लोकसभा मतदारसंघांचा (Lok Sabha Election 2023) आढावा सुरु केला आहे. त्यानुसार आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा (Mumbai North West Lok Sabha constituency) आढावा घेण्यात आला. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या नावावर जोर देण्यात येत आहे. किंबहुना अमोल कीर्तीकरच शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं सांगण्यात येत आहे. अमोल कीर्तीकर हे शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे जर अमोल कीर्तीकर यांचं नाव निश्चित झालं तर बाप विरुद्ध बेटा अशी थेट लढत होईल. 


अमोल कीर्तीकर यांच्या नावावर जोर


उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही अमोल कीर्तीकर यांच्या नावाचा पुनरुच्चार केला. तसंच उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.होऊ दे चर्चा कार्यक्रमही निवडणुकीपर्यंत मुंबईभर सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 


 ठाकरेंच्या लोकसभा आढावा बैठका


शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याअगोदर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विदर्भ ,पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला होता. त्यानंतर आता मुंबईतील लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेतला जात आहे. या बैठकींना माजी नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक आणि इतर पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  


मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ


मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात सध्या गजानान कीर्तीकर हे खासदार आहेत. गजानन कीर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. गजानन कीर्तीकर यांचं या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत आणि 2019  मध्ये संजय निरुपम यांचा यांचा पराभव केला होता. 


गजानन कीर्तीकर हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे होते. त्यांनी बाळासाहेबांच्य खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. मुंबईतील शिवसेनेच्या वाढीसाठी कीर्तीकरांनी झोकून देऊन काम केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कीर्तीकर कुणाला साथ देणार याची उत्सुकता होती. त्यांनी मागील दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. 


उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व,दिंडोशी,गोरेगाव,वर्सोवा,अंधेरी पश्चिम,अंधेरी पूर्व असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.सहापैकी तीन भाजप आणि तीन ठाकरे गट असे आमदार या मतदारसंघात आहेत. मात्र, खासदार असलेले गजाजनन किर्तीकर हे शिंदे गटात आहेत.


कोण आहेत अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) 


अमोल कीर्तीकर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले असले तरी अमोल कीर्तीकर हे ठाकरेंसोबत राहिल्याने, वडील एका पक्षात आणि पुत्र दुसऱ्या असं चित्र पाहायला मिळालं. 


संबंधित बातम्या 


Mumbai News: पित्याच्या विरोधात पुत्र मैदानात, अमोल किर्तीकर ठाकरेंचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार