एक्स्प्लोर
वाढदिवसानिमित्त होर्डिंग्ज लावू नका, उद्धव ठाकरेंचं आवाहन
माझ्या वाढदिवसानिमित्त फलक, होर्डिंग्ज लावू नका, मुंबईचं पर्यावरण जपा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
![वाढदिवसानिमित्त होर्डिंग्ज लावू नका, उद्धव ठाकरेंचं आवाहन Shivsena Chief Uddhav Thackeray appeals not to put hoardings on his birthday latest update वाढदिवसानिमित्त होर्डिंग्ज लावू नका, उद्धव ठाकरेंचं आवाहन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/15143408/uddhav.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 58 वा वाढदिवस आहे. मात्र माझ्या वाढदिवसानिमित्त फलक, होर्डिंग्ज लावू नका, मुंबईचं पर्यावरण जपा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील शिवसैनिक 'मातोश्री' निवासस्थानावर दाखल होत आहेत. शिवसेनेच्या वतीने आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही उद्धव ठाकरे यांना ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या आहे. 'उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य आणि कायम आनंद मिळो' अशा सदिच्छा राहुल यांनी व्यक्त केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. त्यामुळे या निमित्ताने काँग्रेस उद्धव ठाकरेंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे, का असा प्रश्न पडत आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.Best wishes to Shri Uddhav Thackeray ji, on his birthday. I wish him good health and happiness always.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 27, 2018
विशेष म्हणजे राहुल गांधींच्या ट्वीटनंतर काही वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.Wishing Uddhav Thackeray ji a very happy birthday
— Mamata Banerjee (@MamataOfficial) July 27, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. समाजाच्या सेवेसाठी उद्धव यांना सुदृढ आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभकामना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 27, 2018
Birthday wishes to Shri Uddhav Thackeray. May Almighty bless him with a long and healthy life in service of society.
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)