एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना-भाजपचं जागावाटपाबाबत फिफ्टी-फिफ्टी?
शिवसेना-भाजपची विधानसभेच्या 288 पैकी 144-144 जागांची वाटणी व्हावी, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यादृष्टीने सेना-भाजपमध्ये चर्चाही सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असले, तरी पडद्यामागे युतीसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागावाटपाबाबत फॉर्म्युला निश्चित केला जात आहे. विधानसभा निवडणुकीत निम्म्या-निम्म्या जागा लढवण्यावर दोन्ही पक्षांची चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना-भाजपची विधानसभेच्या 288 पैकी 144-144 जागांची वाटणी व्हावी, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यादृष्टीने सेना-भाजपमध्ये चर्चाही सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे. जागावाटपाचा अधिकृत प्रस्ताव अद्याप देण्यात आलेला नसला तरी लवकरच भाजप शिवसेनेला प्रस्ताव देण्याची चिन्हं आहेत.
2019 लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युती, अमित शाहांना खात्रीस
महत्त्वाचं म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत युतीचा मुद्दा याच फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर अडून बसला होता.
जागावाटपावरुन बोलणी फिस्कटल्यामुळे युती तुटली. आता पुन्हा या दोन्ही पक्षांच्या चर्चेला सुरुवात होणार आहे.
शाह आणि फडणवीसांची वेगवेगळी मतं
भाजप अध्यक्ष अमित शाह यांना लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होण्याची खात्री आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अचानक युतीसंदर्भातली आपली भाषा बदलल्याचं दिसत आहे. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना सोबत आली तर ठीक, नाही तर आपण समर्थ आहोत, असं विधान मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी केलं.
युतीबाबत मुख्यमंत्र्यांची भाषा अचानक बदलली!
2019 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला होता. शिवसेना-भाजपची युती लोकसभा निवडणुकांना सामोरी जाईल, अशी खात्रीही शाह यांना वाटते.
स्वबळाचं काय?
याआधी स्वबळाची भाषा करणारी शिवसेना आपल्या घोषणेवर ठाम राहणार, की आपली 'एकला चलो रे'ची तलवार म्यान करणार, हे पाहणंही महत्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement