एक्स्प्लोर

निवडणुका आल्या की भाजप नेते दाऊदचा नागोबा बाहेर काढत आतंकवादाची पुंगी वाजवत बसतात : शिवसेना

Shiv Sena Slams to BJP in Saamana : निवडणुका आल्या की भाजपवाले दाऊदचा नागोबा अन् आतंकवादाची पुंगी वाजवत बसतात, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Shiv Sena Slams to BJP in Saamana : शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला आहे. निवडणुका आल्या की भाजपवाले दाऊदचा नागोबा अन् आतंकवादाची पुंगी वाजवत बसतात, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. लेखात म्हटलं आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात सांगतात की, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी सत्तेवर आली तर अतिरेकी व आतंकवादाचा पुरवठा वाढेल. म्हणजे या देशात नोंदणी झालेला एक राजकीय पक्ष देशात आतंकवादास खतपाणी घालत आहे. मग मोदींचे सरकार व गृहमंत्री इतकी वर्षे हा आतंकवादाचा पुरवठा डोळे उघडे ठेवून का पाहत आहेत? निवडणुका आल्या की, ही मंडळी आपल्या पेटाऱ्यातून दाऊदचा नागोबा बाहेर काढतात व आतंकवादाची पुंगी वाजवत बसतात. हे आता नेहमीचेच झाले आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.  

दाऊदच्या निशाण्यावर भारतासारखा मोठा देश आणखी किती काळ असणार

लेखात म्हटलं आहे की, देशातील अनेक भागांत दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. एनआयएची म्हणे अशी माहिती आहे की, मुंबई-दिल्लीतील अनेक राजकीय नेते व शहरे दाऊद इब्राहिमच्या निशाण्यावर आहेत. आता दाऊदच्या निशाण्यावर भारतासारखा मोठा देश आणखी किती काळ असणार ते ठरवायला हवे. दाऊद पाकिस्तानात आहे व त्यास फरफटत आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दाऊदला पाकिस्तानचे कवच आहे व ते राहणार, पण भारताचे सरकार ते कवच का तोडू शकले नाही? दाऊद भारतावर हल्ला करीत असल्याच्या ऊठसूट दिल्या जाणाऱ्या बातम्या भारताची बेअब्रू करणाऱ्या आहेत, असं लेखामध्ये म्हटलं आहे.  

दाऊद गँगचे कंबरडे मुंबई पोलिसांनी कधीच मोडले

सामनामध्ये म्हटलं आहे की, दाऊद गँगचे कंबरडे मुंबई पोलिसांनी कधीच मोडले आहे. महाराष्ट्राचे पोलीस असे दाऊदी हल्ले उद्ध्वस्त करण्यास समर्थ आहेत, पण पाकिस्तानचे नरडे दाबण्याची ताकद दिल्ली सरकारमध्ये आहे काय? अहमदाबाद येथे जुलै 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील 38 आरोपींना अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी सामुदायिक फाशी ठोठावली, पण त्या बॉम्बस्फोटांतील प्रमुख आरोपींना पकडून त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे काम सगळ्यात आधी मुंबई पोलिसांनीच केले आहे. त्यामुळे दाऊद वगैरेंचे काय करायचे ते पाहता येईल. दिल्लीतील सरकार जागेवर आहे काय? हाच खरा प्रश्न आहे, असं लेखामध्ये म्हटलं आहे. 

‘पुलवामा’लष्करी हत्याकांड कोणी घडवले?

लेखामध्ये म्हटलं आहे की, पाकिस्तानात संपलेला दाऊद आपल्याकडील तपास यंत्रणा व राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी जिवंत ठेवला आहे. दाऊद वगैरे टोळ्यांत आता काही घडवायचा दम उरलेला नाही. ‘पुलवामा’चे लष्करी हत्याकांड कोणी घडवले? त्यात तर आपल्याच सुरक्षा यंत्रणेतील रहस्यमय चुका दिसतात. लडाखमध्ये चिनी सैन्य घुसले आहे ते कोणाच्या दुबळेपणामुळे? त्यांच्यावर हल्ला करायचे सोडून मुंबईतले टिनपाट भाजपा दलाल राजकीय विरोधकांवर हल्ले करत आहेत व अशा हल्लेखोरांना केंद्र सरकार सुरक्षा कवच देत आहे. पंजाबातील निवडणुकांत आजही खलिस्तानवर चर्चा होते. सत्ताधारी व राजकारणी धडधडीत खोटं बोलतात, असं शिवसेनेनं लेखात म्हटलं आहे.

राष्ट्रीय सुरक्षा उघड्यावर पडली 

सामनामध्ये म्हटलं आहे की, सरकार जागेवर नाही. सदैव निवडणूक प्रचारात व विरोधी पक्षाला त्रास देण्याच्या राष्ट्रकार्यात गुंतलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा उघड्यावर पडली आहे. तिकडे कश्मीरात आमचे जवान शहीद होत आहेत. दाऊद दिल्ली-मुंबईवर हल्ला करण्याच्या योजना आखत आहे. हे सर्व प्रकार कमजोर केंद्र सरकारची लक्षणे आहेत. देशात ‘हिजाब’वरून मारामाऱ्या सुरू आहेत, पण दाऊद हल्ले करणार यावर फक्त इशारे देण्याचे काम सुरू आहे. दाऊद हल्ले करणार म्हणजे पाकिस्तान भारताची कुरापत काढणार, हा त्यामागचा सरळ अर्थ आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात आपले कुलभूषण जाधव खितपत पडले आहेत. त्यांचे पुढे काय होणार, यावर सध्या कोणीच बोलत नाही, असं देखील लेखात म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

Mohit Kamboj Coffee With Kaushik : तेजस ठाकरेंचे 'ते' व्हिडीओ, मलिकांशी वैर ते सिद्दिकी प्रकरण
Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget