(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Political Crisis : शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात हॉटेल ताज कन्व्हेन्शनमध्ये उतरणार, पोलिसांकडून मोठा बंदोबस्त
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. गुवाहाटीमध्ये हॉटेल रॅडिसनमध्ये तंबू ठोकून असलेल्या शिवसेना बंडखोर आमदार आज गोव्यात पोहोचत आहेत.
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. गुवाहाटीमध्ये हॉटेल रॅडिसनमध्ये तंबू ठोकून असलेल्या शिवसेना बंडखोर आमदार आज गोव्यात पोहोचत आहेत. गोव्यामध्ये हॉटेल ताज कन्व्हेन्शनमध्ये या आमदारांची सोय करण्यात आली आहे. या हॉटेलसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला किंवा माध्यमांच्या प्रतिनिधींना हॉटेलमध्ये जाण्यास मनाई आहे.
बंडखोर आमदार उद्या गोव्यातून मुंबईसाठी रवाना होतील. राज्यपालांकडून विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून सांगण्यात आलं आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या गोव्यावरून मुंबईला येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सीआरपीएफच्या तब्बल दोन हजार जवानांची सुरक्षा दिली आहे. बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे.
या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी अनेक आमदारांच्या कार्यालयांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे हे आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचं काय असा सवाल विचारण्यात येत होता. आता त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. या बंडखोर आमदारांना विमानतळापासून ते विधानसभेपर्यंत नेण्याची जबाबदारी ही या जवानांवर आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे मोठे 10 निर्णय
- बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबईत केंद्राचे दोन हजार जवान तैनात, विमानतळापासून विधानसभेपर्यंत सुरक्षित नेण्याची जबाबदारी
- राज्यातील 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 ऑगस्टला मतदान, 5 ऑगस्टला मतमोजणी