एक्स्प्लोर

उल्हासनगरात शिवसैनिकांनी भाजप नगरसेवकाला मारहाण करत तोंडाला फासलं काळं, शिवसेनेविरोधात बोलत असल्याने हल्ला

राजेंद्र चौधरी यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रारी केल्यामुळे त्यांनी दडपशाही करण्यासाठी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मारहाण झालेल्या भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला आहे.

कल्याण : एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना उल्हासनगरमध्ये शिवसेनेविरोधात बोलणाऱ्या भाजपा नगरसेवकाला शिवसैनिकांनी थेट काळं फासत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रदीप रामचंदानी असं मारहाण झालेल्या भाजपा नगरसेवकाचं नाव आहे. 

प्रदीप रामचंदानी उल्हासनगर महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य आहेत. रामचंदानी हे आज दुपारच्या सुमारास उल्हासनगर महानगरपालिकेच्या बाहेर आले असता अचानक 8 ते 10 जणांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना खाली पाडून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. मारहाण करण्यासाठी आलेले कार्यकर्ते गळ्यात शिवसेनेची मफलर घालून आल्याचं या घटनेच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

संपूर्ण प्रकारानंतर आपण शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रारी केल्यामुळे त्यांनी दडपशाही करण्यासाठी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मारहाण झालेल्या भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं तालिबानी राज्य असल्याची टीकाही रामचंदानी यांनी केली आहे. 

शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांना या घटनेबाबत विचारलं असता, त्यांनी प्रदीप रामचंदानी हे सातत्याने शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्या विरोधात बोलत असल्यामुळे शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिलं आहे, असं राजेंद्र चौधरी यांनी सांगितलं. हा हल्ला शिवसैनिकांनीच केल्याचं सुद्धा त्यांनी मान्य केलं आहे. या घटनेमुळे उल्हासनगर शहरातील राजकीय वातावरण तापलं असून राणे यांच्या पिलावळीला धडा शिकवण्याचं काम शिवसैनिकांनी केल्याचं सुद्धा शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget