नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला पनवेलजवळ अपघात झाला. एकवीरा देवीच्या दर्शनावरुन परतत असताना ही दुर्घटना घडली. अपघातात शर्मिला ठाकरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. राज ठाकरे दुसऱ्या गाडीत होते. अपघात झाला त्यावेळी त्यांचा ताफा पुढे निघून गेला होता.
विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसेप्रमुख राज ठाकरे आज (5 ऑक्टोबर) सकाळी सहकुटुंब कुलदैवत एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनावरुन परत येत असताना दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
शर्मिला ठाकरे, राज ठाकरे यांच्या बहिण आणि त्यांचे सचिव मोरे हे इनोव्हा गाडीतून येत होते. यावेळी अचानक एक रिक्षा त्यांच्या गाडीसमोर आली. त्यामुळे शर्मिला यांच्या गाडीच्या वाहनचालकाने अर्जंट ब्रेक मारला. त्यामुळे गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ती पुढच्या गाडीला धडकली. तर मागूनही दुसऱ्या गाडीने धडक दिली. यामध्ये तिघांना किरकोळ दुखापत झाली.
या दुर्घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर शर्मिला ठाकरेंसह गाडीतील इतर आणखी दोघे दुसऱ्या गाडीतून मुंबईला रवाना झाले आहेत.
नवी मुंबईत शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Oct 2019 03:22 PM (IST)
विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसेप्रमुख राज ठाकरे आज (5 ऑक्टोबर) सकाळी सहकुटुंब कुलदैवत एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनावरुन परत येत असताना दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -