मुंबई : जर पंधरा वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याने (राज ठाकरे) Raj Thackeray कानाखाली लगावली नसती तर आजही आपल्याला तेच चित्र पाहायला मिळालं असतं, असं राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी म्हटलं आहे. मराठी राजभाषा दिनाच्या (Marathi Bhasha Din) दिवशी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांचे संबोधन केले. महाराष्ट्रात जर मराठी पाट्यांसाठी कोणाच्या काचा, दुकाने फोडावे लागत असतील तर ते लज्जास्पद आहे, असे यावेळी शर्मिला ठाकरे म्हणाल्या. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, पंधरा वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याने आणि तुम्ही एक कानाखाली लगावली तर आज मुंबईत सगळ्यांना मराठी येतं. तुम्ही प्रयत्न करा, मी सगळीकडे मराठीत बोलते. मी अमेझॉन, पिझ्झावाल्याला फोन केला तर मराठीतच बोलते. तुम्ही त्यांच्या देशात, राज्यात गेलात तर त्यांच्या भाषेत बोला पण आपल्या महाराष्ट्रात आपण मराठीतच बोलायला हवं, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
15 वर्षापूर्वींची कानाखाली लावलेली आजवर लक्षात आहे. सगळे मराठी बोलतात. सगळे पटापट मराठी शिकले. मराठी येत नाही असं ते दाखवतात, त्यामुळं तुम्ही मराठीतच बोला असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
या कार्यक्रमात 11 कर्तृत्ववान मराठी महिलांचा गौरव देखील करण्यात आला. मराठी भाषा दिन म्हणून आजच्याच दिवशी नाही तर वर्षाचे 365 दिवस मराठीतच बोलले पाहिजे आणि यापुढे सर्व नागरिकांनी मराठीतच बोलावे असे आवाहन महिला मनसे पदाधिकाऱ्यांना शर्मिला ठाकरे यांनी केले.
शर्मिला ठाकरे यांना युवराज संभाजी छत्रपती मराठा आरक्षणासाठी गरज असलेल्या आमरण उपोषणा बाबत विचारले असता, समाजात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण दिले पाहिजे असे देखील आरक्षणाच्या मुद्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तर लता दिदींच्या स्मारकापेक्षा त्यांच्या आठवणीत मोठे संगीत विद्यापीठ सुरू करावे असे मत यावेळी शर्मिला ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : युद्धाच्या चौथ्या दिवशीही युक्रेनवर हल्ला सुरूच, दोन मोठ्या शहरांना घेरल्याचा रशियाचा दावा
- North Korea : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी, दक्षिण कोरियाकडून पुष्टी
- Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धात आण्विक शस्त्रांचा वापर? जगभरात खळबळ; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा बेलारूसला फोन