Sharad Pawar On Chhagan Bhujbal: राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्तुतीसुमनं उधळली. भुजबळांबद्दल बोलताना पवार म्हणाले की, ते सुरुवातीच्या काळात भाजीविक्रीचा व्यवसाय करत होते. त्यावेळी मुकुंद ठकोजी पाटील, व्ही डी जुथे यांनी भुजबळ कुटुंबाला मदत केली होती. त्याचं दुकान जाणार होतं. मात्र या दोघांनी ते दुकान वाचवलं. त्यानंतर भुजबळ यांनी शिवसेनेचं नेतृत्व केलं. महापौर झाले, आमदार झाले. त्यांना काहीच राजकीय पार्श्वभूमी नाही, तरीही त्यांनी विविध पदे भूषवली, असं शरद पवार म्हणाले.  


शरद पवार म्हणाले की, भुजबळ यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधलं, दिल्लीतील सर्वात उत्तम वास्तू बांधली. यासाठी एक रुपया देखील खर्च होऊ दिला नाही. भुजबळांचा आज सत्कार केला. त्यांना सत्कारावेळी फुले पगडी घातली असती तर चांगलं झालं असतं. भुजबळ जी कामं करतात त्यांच्या पाठिशी आपण सगळे उभे आहोत, असंही शरद पवार म्हणाले. 


... आणि भुजबळ भावुक झाले


भुजबळांनी शिवसेना सोडायला नको होती, अशा आशयाचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी केलं. त्यानंतर छगन भुजबळ शिवसेनेच्या आठवणीत रमून गेल्याचे पाहायला मिळाले. शिवाय उद्धव ठाकरे बोलत असताना छगन भुजबळ भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.  उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसनिमित्त (Chhagan Bhujbal Birthday) आज मुंबईत सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमात भुजबळ म्हणाले की, लोकं म्हणतात यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली. त्यांना सांगायचं आहे की, पहाटे 3 वाजल्यापासून आम्ही भाज्या विकायचो. हळूहळू भाज्या कंपन्यांना विकण्याचं कंत्राट घेतलं होतं. आम्ही हळूहळू कंपन्या सुरू केल्या आणि त्यानंतर पैसा उभा राहिला, असं भुजबळ म्हणाले. 


पुस्तकाचे प्रकाशन 
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास शरद पवार, उद्धव ठाकरे, डॉ.फारुख अब्दुल्ला, डॉ.जावेद अख्तर, अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान व विजय सामंत यांनी  छगन भुजबळ यांच्या जीवनावर पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आले.


ही बातमी देखील वाचा