एक्स्प्लोर
आत्महत्या रोखणारा ‘अॅण्टी-सुसाईड’ पंखा!

मुंबई: मुलुंडमधील शरद अशानी यांनी पंख्यामधील अॅण्टी-सुसाईड रॉड तयार केला आहे. क्रॉम्पटन ग्रिव्ह या कपंनीतून निवृत्त झाल्यानंतर शरद अशानी यांनी हा रॉड तयार केला. सध्या भांडुपमधील त्यांच्या वर्कशॉपमध्ये मागील दोन महिन्यांपासून या रॉडचं उत्पादन सुरु आहे. ' नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार,, देशात तब्बल 1.3 लाख लोकं दरवर्षी आत्महत्या करतात. त्यातील तब्बल 60,000 लोकं पंख्याला लटकून गळफास घेतात. याला आळा बसावा यासाठी मी पंख्यामधील अॅण्टी-सुसाइड रॉड तयार केला.' असं शरद अशानी म्हणाले. पंख्यातील या रॉडमुळे अनेकांचे प्राण नक्कीच वाचू शकतात असा शरद अशानी यांनी दावा केला आहे. जर एखादी व्यक्ती पंख्याला लटकून गळफास घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्या पंख्यात हा रॉड बसवला असेल तर यामुळे गळफास घेता येणार नाही. कारण ज्यावेळी ती व्यक्ती गळफास घेईल त्यावेळी हा रॉड पंख्यासह पूर्णपणे खाली येईल. त्यामुळे गळ्याला फास बसणार नाही. शरद अशानी यांनी आतापर्यंत असे 100 रॉड तयार केले असून दर महिन्याला दहा हजार रॉड तयार करण्याची त्यांच्या फर्मची क्षमता आहे. या रॉडला त्यांनी ‘गोल्ड लाईफ’ असं नाव दिलं असून प्रत्येक पंख्यात हा रॉड बसवता येऊ शकतो. असं त्यांचं म्हणणं आहे. या रॉडची किंमत अवघी 250 रुपये आहे. तसेच कोणत्याही जुन्या किंवा नव्या पंख्यात हा रॉड सहजपणे बसवता येईल. 'या रॉडमध्ये अर्लामही तयार करण्याचा मी प्रयत्न करत आहे. ज्यामुळे कुणी पंख्याला लटकून गळफास घेण्याचा प्रयत्न करत असेल तर या अलार्ममुळे इतर लोकांना तात्काळ माहिती मिळू शकते.' असं शरद अशानी म्हणाले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























