फोंडा यांनी सध्या बलात्कार विरोधी कायद्याच्या बाबतीत जगातील आघाडीच्या राष्ट्रांमध्ये काय परिस्थिती आहे? याची माहिती कोर्टाला दिली. 'अमेरिकेतील कायद्यानुसार बलात्कार हा गुन्हा सामाजाच्या नाही, तर केवळ पीडितेच्या दृष्टीकोनातून पाहिला जातो' असं फोंडा यांनी कोर्टाला सांगितलं. त्यामुळे परदेशात बलात्काराच्या घटनेचं भांडवलं केलं जात नाही, असं त्यांनी कोर्टाला सांगितलं.
भारताबाबत विचार करायचा झाल्यास 1952 पासून बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली. 2012 पर्यंत या गुन्ह्याने धोक्याची मर्यादाच ओलांडली होती. त्यामुळे यासंदर्भातील कायद्यात सुधारणेची मागणी जोर धरु लागली. त्यानंतर दिल्लीतील निर्भया केसला निर्णायक घटना मानून सरकारने अखेरीस 376 कलमात बदल केला.
शक्ती मिल गँगरेप प्रकरणी फाशीची शिक्षा योग्यच, हायकोर्टात केंद्र सरकारचं उत्तर
मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या शक्ती मिल गँगरेप प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या तिघांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने कलम 376 (ई) या कायद्यात सुधारणा करत संबधित आरोपीने दोन वेळा बलात्काराचा गुन्हा केल्यास त्याला जन्मठेपेची अथवा फाशीची शिक्षा ठोठावू शकतो, अशी तरतूद करण्यात आली आहे. कायद्यातील या सुधारणेलाच तिघांनी या याचिकेतून आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे यासंदर्भातील याचिकेवर पुढील आठवड्यातही सुनावणी सुरु राहील.
शक्ती मिल गँगरेप : हत्या-बलात्काराच्या क्रौर्याची तुलनाच अशक्य, फाशी योग्य, राज्य सरकारचा कोर्टात दावा
मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 रोजी संध्याकाळच्या वेळी एक महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर पाच नराधमांनी बलात्कार केला होता. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली तर सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तीन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.