एक्स्प्लोर
मुंबईतल्या वांद्रे परिसरात शाहरुखच्या फॅन्सची चेंगराचेंगरी

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या हस्ते '#Bandra' या शिल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र, यावेळी शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीत अनेक पत्रकार आणि उपस्थित नागरिक खाली पडले. गर्दीतून वाट काढत शाहरूख कसाबसा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचला. अखेर 10 मिनिटात त्यानं उद्घाटन उरकलं. मात्र, चाहत्यांच्या गराड्यातून बाहेर पडताना शाहरुखची चांगलीच दमछाक झाली. https://twitter.com/poonam_mahajan/status/818772861812809731 या कार्यक्रमाला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या. शाहरुखचे चाहते आणि भाजप कार्यकर्ते यांनी केलेल्या गर्दीमुळे काही वेळासाठी वाहतूकही खोळंबली होती.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली






















