एक्स्प्लोर
शेअर बाजारात मोठी घसरण
आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 360 अंकांनी तर निफ्टी 109 अंशांनी घसरला आहे.
मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 360 अंकांनी तर निफ्टी 109 अंशांनी घसरला आहे. बीएई जवळपास 360 अंकांनी घसवून 38000च्या खाली आला आहे. तर निफ्टी 109 अंकांनी घसरून 11425 अंकावर आली आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि फार्मासिटीकल कंपन्या वगळता आज सर्वच क्षेत्रात मंदीचं वातावरण पाहायला मिळालं. तसेत बँकांच्या शेअर्सवरही परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे.
विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मात्र एक्सिस बँक, एशियन पेन्ट्स, एसबीआय, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, ओएनजीसी, मारुती, सन फार्मा यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरणा पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement