मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर झाली. यामध्ये पदवी प्रथम वर्ष प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीची तुलना केल्यास दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या कट ऑफमध्ये दोन ते तीन टक्क्यांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तर नामवंत कॉलेजच्या सेल फायनान्स अभ्यासक्रमांचा कट ऑफमध्ये घसरण जरी झाली असली तरीसुद्धा कट ऑफ अजूनही दुसऱ्या फेरीनंतर नव्वदी पार पाहायला मिळतेय. ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे. अशा विद्यार्थ्यांना 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. 30 ऑगस्टला सायंकाळी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
पदवी प्रवेशाचे नामांकित महाविद्यालयांचे दुसऱ्या गुणवत्ता यादीचे कटऑफ
सेंट झेविअर्स महाविद्यालय
बीएस्सी प्रथम वर्ष - 90.59 टक्के
बीएमएस - 91.47
बीएमएम - 89.87
रुईया महाविद्यालय
बी ए प्रथम वर्ष- 95
बीएस्सी प्रथम वर्ष - 84
बीएस्सी कम्युटर सायन्स - 92.80
बीएमएम (आर्टस् )-95
बीएमएम(कॉमर्स) - 93.67
बीएमएम(सायन्स) - 92.17
विल्सन महाविद्यालय
बीएमएस (कला)- 87.5
बीएमएस(वाणिज्य)- 92.83
बीएमएस(विज्ञान)- 87.83
बीकॉम - 91.33
बीएस्सी - 63.54
बीएस्सी आयटी - 87.67
बीएएफ - 91.33
साठ्ये महाविद्यालय
बीकॉम प्रथम वर्ष - 80
बीएमएस (वाणिज्य )- 85
बीए - 39
बीएस्सी - 46
बीएस्सी आयटी - 82
हिंदुजा महाविद्यालय
बीकॉम प्रथम वर्ष- 89.2
बीएमएस (वाणिज्य ) - 91.40
बीएमएस (विज्ञान )- 83.50
बीएमएस (कला )- 78.67
रुपारेल महाविद्यालय
बीकॉम प्रथम वर्ष- 82
बीएस्सी आयटी - 82
बीएस्सी (कॉम्पुटर सायन्स) - 82.33
बीएमएस (वाणिज्य)- 88.16
बीए - 90.83
डहाणूकर महाविद्यालय
बीकॉम - 84
बीएमएस (बीकॉम)- 88.83
बीएमएस (सायन्स)- 72.16
एफबीकॉम (अकाउंट अँड फायनान्स )- 88.16
एफबीकॉम(बँकिंग अँड इन्युरन्स)- 77.50
एफबीकॉम( फायनान्शिअल मॅनेजमेंट)- 82.50
इतर बातम्या