एक्स्प्लोर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील 1,454 कोटींचा निधी वितरित

दुसऱ्या हप्त्यात कोकण विभागाला सुमारे 7.06 कोटी, नाशिक विभागाला 446.48 कोटी, पुणे विभागाला 206.59 कोटी, औरंगाबाद विभागास 525.29 कोटी, अमरावती विभागास 237.18 कोटी आणि नागपूर विभागास 32.13 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून 31 मार्चपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

मुंबई : गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या 151 तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा सुमारे 1 हजार 454 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आज राज्य शासनाने वितरित केल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.

केंद्राच्या दुष्काळ संहितेप्रमाणे राज्यातील 151 तालुक्यात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी 2 हजार 909 कोटी 51 लाख 9 हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता दिली होती. त्यापैकी मदतीचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला होता.

आता उर्वरित 1 हजार 454 कोटी 75 लाख 54 हजार 680 एवढी रक्कम विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही रक्कम तातडीने पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहचावी, यासाठी मदत निधीचा दुसरा हप्ता तात्काळ वितरित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसऱ्या हप्त्यात कोकण विभागाला सुमारे 7.06 कोटी, नाशिक विभागाला 446.48 कोटी, पुणे विभागाला 206.59 कोटी, औरंगाबाद विभागास 525.29 कोटी, अमरावती विभागास 237.18 कोटी आणि नागपूर विभागास 32.13 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून 31 मार्चपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व पुणे विभागास पहिल्या हप्त्याची 1 हजार 454 कोटी 75 लाख 54 हजार 680 एवढी रक्कम 29 जानेवारीला वितरित करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्य शासनाने ही मदत जाहीर केली असल्याचं निंबाळकर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget