एक्स्प्लोर

एसटीशी जुळले नाते! शाळकरी मुलाची हायकोर्टात धाव

वसई : वसईतील शाळकरी मुलाने एसटी बस सेवेसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. शारीयन डाबरे असे या सातवीत शिकणाऱ्या लहानग्या याचिकाकर्त्याचे नाव आहे. एसटीशी जुळलेल्या नात्यातून शारीयनने हे पाऊल उचललं आहे. वसईच्या ग्रामीण जीवनाशी गेली 50 वर्षे अखंडपणे नाळ जुळलेली एसटीचा लाल डब्बा आता वसईतून हद्दपार होणार आहे. कारण येत्या 1 एप्रिलपासून वसईत एसटी महामंडळाची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीशी जुळले नाते! शाळकरी मुलाची हायकोर्टात धाव तोटा होत असल्याचं कारण पुढे करत एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वसई-विरार महानगरपालिकने शहरात परिवहन सेवा सुरु केल्याने एसटी महामंडळाला मोठा फटका पडला आहे. महानगरपालिकेची परिवहन सेवा गर्दीच्या मार्गावर चालते. मात्र, ग्रामीण भागात नाममात्र प्रमाणात ही एसटी सेवा सुरु आहे. म्हणूनच 30 ऑगस्ट 2016 ला एसटी महामंडळाने एसटी सेवा बंद कण्याची घोषणा केली. त्यानंतर पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केली. नागरिकांच्या या मागणीला दाद देत एसटी महामंडळाने मुदत वाढवून 30 मार्चपर्यंत केली. नागरिकांनी अनेक मंत्रालयाचे उंबरठेही झिजवले. मात्र, त्यांना कुणीच दाद दिली नाही. एवढच नाही तर वसईतले राजकारणी देखील केवळ लेटरबाजी करून गप्प राहिले. अखेर आपल्याला न्याय मिळावा म्हणून वसईतल्या भुईगावमध्ये राहणाऱ्या 7 वर्षीय मुलाने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. आपल म्हणनं त्याने आपल्या शिक्षिकेला सांगितलं आणि शिक्षिकेने देखील पुढाकार घेत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. वसईच्या या ग्रामीण पट्ट्यातून अनेक लोक सकाळी 5 वाजता लोकलने कामाला मुंबईला जातात. सध्या महापालिकेची परिवहन सेवा ग्रामीण भागात केवळ दिखावूपणाची सेवा देते. जर 1 एप्रिलपासून जर एसटी सेवा बंद झाली, तर नागरिकांचे प्रचंड हाल होतील. त्यातच मुलांच्या परीक्षासुद्धा चालू आहे. जर एसटी सेवा जर बंद झाली तर खासगी गाडीशिवाय नागरिकांना पर्याय उरणार नाही. महामंडळाच्या एसटीचं आणि वसईकरांचा मागील 50 वर्षांपासूनच नातं आहे. जर ही  हक्काची सेवा जर बंद झाली, तर कारायचं तरी काय, हा  प्रश्न उपस्थित झाला आहे. आता येत्या 24 मार्च ला या  याचिकेवर सुनावणी  होणार आहे. न्यायालय आता काय निर्णय देणार याकडे वसईकरांचं लक्ष लागलं आहे. न्यायालय आमच्या बाजूने निर्णय देईल, अशी आशा या मुलांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Mumbai BMC : मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget