एक्स्प्लोर

छेडछाडीच्या भीतीने सीएसएमटीजवळ विद्यार्थिनीची लोकलमधून उडी

ट्रेनचा वेग फारसा वाढला नव्हता. तिला ट्रॅकवर काही गँगमन दिसले. ते आपली मदत करतील या विचाराने तिने जीवाच्या आकांताने लोकलमधून उडी मारली.

मुंबई : छेडछाडीच्या भीतीनं मुंबईत 13 वर्षांच्या विद्यार्थिनीने धावत्या लोकलमधून उडी मारली. यामध्ये तिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पायल कांबळे असं या घटनेत जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे. रविवारी सकाळी 9.29 च्या लोकलने पायल सीएसएमटीहून करी रोडला ट्युशन्ससाठी निघाली होती. सीएसएमटीवरुन ट्रेन निघत असतानाच एक युवक महिलांच्या डब्यात चढला. त्यावेळी पायल लेडीज सेकंड क्लासच्या मिडल कम्पार्टमेंटमध्ये एकटीच होती. युवकाने आपल्याला शांत राहण्याची वार्निंग दिल्याचं तिने सांगितलं. घाबरुन तिने अलार्म चेन खेचायला सुरुवात केली. ट्रेन थांबत नसल्यानं तिचे प्रयत्न सुरुच होते. युवक तिला शांत बसण्याची वार्निंग देत जवळ जात होता. धीर एकवटून पायल ट्रेनच्या दरवाज्याजवळ गेली. ट्रेनचा वेग फारसा वाढला नव्हता. तिला ट्रॅकवर काही गँगमन दिसले. ते आपली मदत करतील या विचाराने तिने जीवाच्या आकांताने लोकलमधून उडी मारली. यामध्ये पायलच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिला पाहून गँगमन मदतीला धावले. पायलला सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर नेण्यात आलं. आरोपी तरुण मस्जिद स्टेशनला उतरल्याचा संशय असून त्याची ओळख पटलेली नाही. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस तपास करत आहेत. पायलचा फोन किंवा दागिने चोरण्याच्या हेतूने तो जवळ येत असेल, असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Tukaram Mundhe Marathi News: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस...कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
ठाकरे, शिंदे, फडणवीस...तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget