एक्स्प्लोर
वहीत वेळ आणि ठिकाण लिहून विद्यार्थ्याची आत्महत्या
मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यामध्ये आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने सोसायटीच्या गार्डनमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी त्याने वेळ आणि ठिकाण वहीत लिहून ठेवलं होतं
वसई : वहीत आत्महत्येची वेळ आणि ठिकाण लिहून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात उघडकीस आली आहे. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने सोसायटीच्या गार्डनमधील पूल-अपच्या लोखंडी रॉडला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
14 वर्षांच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असलं, तरी मृत्यूपूर्वी त्याने केलेलं संशयास्पद लेखन सापडलं आहे. वहीमध्ये त्याने आपल्या आत्महत्येचं ठिकाण आणि वेळ लिहिलेली दिसून येत आहे. तसंच काही पानांवर आत्महत्या कशी करायची, याची चित्रंही काढली होती.
संबंधित विद्यार्थी नालासोपारा पूर्व भागात आपल्या कुटुंबासोबत रहात होता. मंगळवारी रात्री सोसायटीच्या गार्डनमधील पूल-अप करणाऱ्या लोखंडी रॉडला त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
विद्यार्थ्याच्या दप्तरात एका वहीमध्ये काही पानांवर त्याने लिहिलेला मजकूर आणि चित्र पाहून सर्वच जण अचंबित झाले. एका पानावर त्याने पंखा आणि लटकणारी दोरी असं दाखवलं होतं. तर दुसऱ्या पानावर आत्महत्या कुठल्या ठिकाणी करणार त्या 'ए विंग'चा उल्लेख केलेला आढळला.
आत्महत्येची वेळ 9.30 वाजता असंही वहीत लिहलेलं आढळून आलं. त्यामुळे त्याने पूर्णपणे नियोजन करुन आपलं जीवन संपवल्याचं दिसून आलं आहे. विद्यार्थ्याच्या अकाली मृत्यूमुळे त्याचे मित्र मंडळी आणि कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मात्र त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, हे अद्याप अनुत्तरितच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement