एक्स्प्लोर

आगामी निवडणुकीत कोण कुणाला आडवं करतं बघू : उदयनराजे

कुणाला वाटत असेल की मी उदयनराजे पेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, त्याने आकडे दाखवावे मी त्याच्या प्रचाराचे काम करेन, असंही उदयनराजे म्हणाले.

मुंबई : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कामानिमित्त मी मंत्रालयात येत असतो. मी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या भेटी घेत असल्याचं उदयनराजे यांनी यावेळी सांगितलं.

उदयनराजेंच्या खासदारकीच्या उमेदवारीला अनेकांचा विरोध असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. याविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले की, "अनेकजण म्हणाले उदयनराजे नको कुणीही चालेल, अगदी मला आडवं करायचं चाललंय. कोण कुणाला आडवं करतं ते येणाऱ्या निवडणुकीत बघू. जनतेला वाटलं तरच मी निवडणूक लढणार, कारण जनता हाच माझा पक्ष आहे."

"कुणाला वाटत असेल की मी उदयनराजेंपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, त्याने आकडे दाखवावे मी त्याच्या प्रचाराचे काम करेन" असं थेट आव्हान उदयनराजे यांनी दिलं.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, "लोकशाहीत इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे अनेकांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते, माझा त्याला विरोध नाही. लोकांचा पाठिंबा याला मी खासदार पदापेक्षा जास्त महत्त्व देतो."

"आज विविध कामांच्या उद्घाटनानिमित्त आणि भूमिपूजनानिमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मतदार संघातील कामांबाबतही चर्चा झाली. आजचे मंत्री आमदार नसल्यापासूनचे माझे मित्र आहेत", असं उदयनराजे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीवादीतर्फे मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उदयनराजेंनी स्पष्ट केलं होतं की, " साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे. मात्र पवारसाहेब अंतिम निर्णय घेतील. मला विरोध झाला तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. अनेकांचा मला पाठिंबा आहे, अशी कोपरखळी उदयनराजेंनी लगावली होती."

"पवार साहेबांनी मतदार संघाचा आढावा घेतला आहे. साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. जसे पवार साहेबांचे अन्य पक्षात मित्र आहेत, तसेच अन्य पक्षातही माझे मित्र आहेत", असं सूचक वक्तव्य उदयनराजेंनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
धक्कादायक! भायखळा पोलीस ठाण्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आगीचं नेमकं कारण काय?
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
Jana Nayagan BO Collection: थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, चौथ्या दिवशीच धुवांधार कमाई
थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
Embed widget