Sanjay Raut on Raj Thackeray : कणकवली येथे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा पार पडली. यात राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे. 


संजय राऊत म्हणाले की, कणकवलीत राज ठाकरे यांची सभा पार झाली. उद्धव ठाकरेही कोकणात होते. आदीत्यही होते. प्रकल्पांना विरोध का होतोय हेही समजून घेतले पाहिजे. चांगले प्रकल्प महाराष्ट्राबाहेर न्यायचे. राज ठाकरेंचे प्रिय मोदी व शहा यांनी महाराष्ट्राचा विध्वंस करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे. ते सध्या मोदी शहाचे भक्त झाले आहेत. कोकणातील सूपुत्रांचा काल त्यांनी अपमान केला आहे. 


मौनी खासदारांचं समर्थन करणे मनसे प्रमुखांची मजबुरी


तुम्हाला बाक बडवणारे हवेत की मोदींच्या मंत्रीमंडळात हवे, असे राज ठाकरे म्हणाले. मोदींच्या मंत्रीमंडळात राहून राणेंनी काय दिवे लावले ते त्यांच्या प्रियजनांनी सांगावे. बॅरिष्टर नाथ, मधु दंडवते, मधु लिमवते हेही कोकणातून गेले आहेत ते काय फक्त बाक बडवायचे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. लोचटगिरी करून दहा पक्ष बदलणारे यांना हवेत. मात्र मी सांगू इच्छितो की बाक बडवणाऱ्या 105 जणांवर मोदींनी कारवाई केली आहे. हे मौनी खासदाराचं समर्थन करताय ही मनसे प्रमुखांची मजबुरी आहे. ते नकली अंधभक्त आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


इतिहास पून्हा रचला जाईल


मोदी पुलवामावर बोलत नाही. औरंगजेबाबाबत शाहांना खूप प्रेम आहे. मोदी व शाह वारंवार औरंगजेबचं प्रेम व्यक्त करत आहे. कारण तो गुजरातच्या मातीतून जन्माला आला आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात तेच असतात आणि आमच्या डोक्यात महाराज असतात. मात्र इतिहास पून्हा रचला जाईल. सगळी संपत्ती अदानींची ही मोदी शहींनी दिली तर ती गरीबात वाटली पाहिजे, असेही  संजय राऊत यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या तोंडात सत्तेचा बोळा असता तर ते नारायणराव राणेंवर कौतुकाचा वर्षाव; राज ठाकरेंच्या सभेतील 10 मुद्दे


Raj Thackeray Speech : मला जुगार खेळता येत नाही, 5 वर्षातून एकदा जुगार खेळतो, आत गेलो तर भिंगऱ्या भिंगऱ्या फिरवत होते, राज ठाकरे काय काय म्हणाले?