एक्स्प्लोर

अदृश्य ‘हात’ दोन्ही बाजूकडे असतात : संजय राऊत

राज्याचं व्हिजन ठरवण्याऐवजी मुख्यमंत्री निवडणुकांच्या राजकारणात मश्गुल आहेत. असा पलटवारही संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केला.

मुंबई: ‘अदृश्य हात फक्त सत्ताधाऱ्यांकडे किंवा खुर्चीवर बसलेल्यांकडेच नसतात. तर ते अदृश्य हात दोन्ही बाजूकडे असतात.’ अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘अदृश हाताच्या’ सूचक वक्तव्याला उत्तर दिलं आहे. एबीपी माझाच्या व्हिजन पुढच्या दशकाचं या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आम्ही दोन वेगवेगळे पक्ष आहोत त्यामुळे थोड्या कुरबुरी होतच राहणार. पण त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. जर तशी परिस्थिती उद्भवलीच तर यासाठी अनेक अदृश्य हात हे आमचं सरकार वाचवण्यासाठी पुढे सरसावतील. त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. कोणताही भूकंप होणार नाही.’ असं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला स्पष्ट इशारा दिला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘अदृश्य हात फक्त सत्ताधाऱ्यांकडे किंवा खुर्चीवर बसलेल्यांकडेच नसतात. तर ते अदृश्य हात दोन्ही बाजूकडे असतात. देशातील राजकारण अनेकदा अदृश्य हातानीच चाललं आहे. जेव्हा काँग्रेसचं दिल्लीत अल्पमतातील सरकार होतं तेव्हा देखील त्यांना अदृश्य हातांनीच मदत केली होती. महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारांचं बहुमत नसलेलं सरकार जेव्हा-जेव्हा अस्थिर झालं होतं तेव्हा अदृश्य हातानी त्यांना मदत केली होती.’ ‘ज्याच्याकडे सत्ता असते त्याच्या मागे अदृश्य हातांची मदत असतेच. फक्त तुम्ही त्या अदृश हातांमध्ये काय कोंबता महाराष्ट्राच्या इभ्रतीचा बळी देऊन आणि तिजोरीचा बळी देऊन ते महत्वाचं.’ असं म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं. राज्याचं व्हिजन ठरवण्याऐवजी मुख्यमंत्री निवडणुकांच्या राजकारणात मश्गुल आहेत. असा पलटवार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केला. संबंधित बातम्या:

सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी : मुख्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Mumbai : अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Minister Wealth : देशातील सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा

Embed widget