एक्स्प्लोर
Advertisement
आरे मेट्रो कारशेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला : निरुपम
18 हेक्टर जमीन मेट्रोला आणि उरलेली 12 हेक्टर जमीन विकासकाला देण्याचा डाव असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
मुंबई : मुंबई मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मेट्रोच्या कारशेडसाठी फक्त 12 हेक्टर जागा लागते. मात्र मुख्यमंत्र्यांनी 30 हेक्टर जागेला मंजुरी दिली. 18 हेक्टर जमीन मेट्रोला आणि उरलेली 12 हेक्टर जमीन विकासकाला देण्याचा डाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विरोधानंतरही मुख्यमंत्री मेट्रोचं कारशेड आरेमध्येच बनवण्यासाठी आग्रही का आहेत, असा सवाल निरुपम यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी बिल्डरांसोबत हात मिळवणी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही.
संजय निरुपम यांचे आरोप काय आहेत?
- मेट्रो कारशेडसाठी 12 हेक्टर जागा लागते, मात्र मुख्यमंत्र्यांचा 30 हेक्टर जागेसाठी हट्ट
- उर्वरित 18 हेक्टर जमीन बिल्डरला देण्याचा घाट
- यातून मुख्यमंत्र्यांना 18 हजार कोटींचा फायदा होणार
- मेट्रोसाठी रेसकोर्स, कलिना, कांजुरमार्गची जागा उपलब्ध होती
- मेट्रो कारशेडसाठी उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांकडे डोळेझाक
- कमर्शिअल आणि रियल इस्टेटसाठी सरकारकडून आरे कॉलनीचा हट्ट
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement