Salman Khan, Amruta Fadnavis Security : बॉलिवूडचा दबंग सलमान खानची (Salman Khan) सुरक्षा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाढवली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीनंतरच राज्य सरकारने सलमान खानची सुरक्षा वाढवली असून त्याला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची सुरक्षा वाढवली आहे. याचा अर्थ सलमान खान आणि अमृता फडणवीस यांना आता चार शस्त्रधारी सुरक्षारक्षक 24 तास सुरक्षा पुरवणार आहेत.


सलमान खानची सुरक्षा हा मुंबई पोलीस आणि राज्य सरकारसाठी सर्वात चिंतेचा विषय बनला होता. कारण दिल्ली पोलिसांकडून सलमान खानला धमकीशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळत होती. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनीही सलमान खानबाबत अनेक खुलासे केले होते. आरोपींचा जबाब आणि तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचा एक अहवाल पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला सोपवला होता. यानंतर सलमान खानला शस्त्राचा परवानाही दिला होता, असं सूत्रांनी सांगितलं होतं. पंजाब, दिल्ली एयर महाराष्ट्र पोलिसांना तपासात लोरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार हे सलमान खानवर हल्ला करण्याची योजना आखत होते. 


एखाद्या व्यक्तीला सुरक्षाकवच प्रदान करावं की नाही यासाठी राज्याचा गुप्तचर विभाग आपला अहवाल बनवतो. संबंधित व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे याच्या आधारावर त्याला सुरक्षा कवच दिलं जातं. यापूर्वी राज्य सरकारने अक्षक कुमारला एक्स श्रेणीची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे अक्षय कुमारला तीन पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सुरक्षा देतात. ज्याला सुरक्षा दिली आहे तोच या सुरक्षेसाठी लागणारा खर्च देतो, असं सूत्रांनी सांगितलं.


आणखी काही लोकांचीही सुरक्षा वाढवली


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनाही Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांना 2005 पासूनच सुरक्षा आहे. 2019 मध्ये ही X दर्जाची करण्यात आली होती. आता ती वाढवून  Y+ करण्यात आली.


भारताचे सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे नातेवाईक अजय पीरामल यांचीही सुरक्षा वाढवली आहे. आता त्यांना Y+ सुरक्षा कवच असेल. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला सातत्याने मिळणाऱ्या धमकीनंतर सुरक्षा वाढवण्यात आली.


बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटानंतर त्यांची सुरक्षा वाढवली आहे.


संबंधित बातमी