मुंबई : सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवर आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट (SeatBelt)  लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर मंगळवारपासून दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडून कडक समज' देण्यात येणार आहे. तर सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.  मात्र लोकांमध्ये अद्याप सीट बेल्ट संदर्भात जनजागृती नसल्याने सीटबेल्टसाठी मुदत आणखी वाढवण्यात आलेली आहे


मुंबईत अनेक कारचालकांनी अद्यापही सीटबेल्ट बसवलेले नाहीत. त्यामुळे सीटबेल्ट संदर्भात आज पासून फक्त समज दिला जाणार आहे. सीटबेल्टकरता ही मुदतवाढ देण्यात आली आहे.  तसेच सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश वाहतूक पोलिस  यांनी दिले आहेत. सीटबेल्टच्या सक्तीमधून जुन्या वाहनांना तात्पुरते वगळण्यात आले आहे अशी माहिती देखील वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.


मुंबई वाहतूक पोलिसांनी सर्वप्रथम सीट बेल्टच्या कारवाईबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व ट्रॅफिक युनिटला दहा  दिवस वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यास सांगितले आहे.  दहा दिवसांनंतर चालक आणि मागे बसलेले प्रवासी सीटबेल्टशिवाय आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.  मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना बहुतांश टॅक्सीत सीट बेल्ट लावलेले आढळले नाहीत.  त्यामुळे कारवाई करण्यापेक्षा जनजागृती करणे खूप महत्त्वाचे होते.मात्र, वाहतूक पोलिस आणि वाहनधारकांमध्ये रस्त्यावर गोंधळ होऊ नये.  म्हणून वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रथम जनजागृती करण्याचे ठरवले आहे.  11 नोव्हेंबर पासून दंडात्मक कारवाई सुरवात होणार आहे.


मुंबईत टॅक्सीमेन्स युनियनने सीटबेल्टच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. काळी-पिवळी टॅक्सीचालकांना चार प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र पाठीमागे तीन प्रवासी बसत असल्याने तसेच कार उत्पादकांनी मागच्या दोनच सीटना सीट बेल्टची सुविधा दिल्याने तिसरा प्रवासी सीट बेल्ट लावू शकत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी टॅक्सीची खासगी कारसोबत तुलना करू नये असे पत्र मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने वाहतूक विभागाला लिहिले आहे.


संबंधित बातम्या :


Mumbai Seatbelt : चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस, मुंबईकरांच्या मनात काय?