एक्स्प्लोर

आघाडी सरकार तिरडीवर झोपलेले कोरोनाग्रस्त सरकार; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

आघाडी सरकार तिरडीवर झोपलेले कोरोनाग्रस्त सरकार असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे. या सरकारला शेतकऱ्यांचं काही पडलेलं नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय.

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलेलं आहे. या सरकारलाच कोरोना झाला असून सरकारमधील सर्व मंत्री क्वॉरंटाईन झालेत. यांना शेतकऱ्यांचे देणं-घेणं नसल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाल्या असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आघाडी सरकारवर टीका केलीय. आघाडी सरकार तिरडीवर झोपलेले कोरोनाग्रस्त सरकार : सदाभाऊ खोत हे सरकार आम्हाला लुटणारचं असेल तर आम्हीच आमचं दूध फुकट द्यायला तयार आहोत. तुम्ही घेऊन जावा. यातून सराकार जागं झालं तर ठिक, नाही जागं झालं तर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल. कारण. शेतकऱ्यांसमोर आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. हे सरकार कोरोनाच्या तिरडीवरती झोपलेले आहे. या सरकारलाच कोरोना झालाय. तर सरकारमधील सर्व मंत्री क्वॉरंटाईन झाले असल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. पारंपरिक शेतीला फाटा देत बीडच्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग; एक एकरात 10 लाखांचं विक्रमी उत्पादन मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याची काळजी नाही : खोत सदाभाऊ पुढे म्हणले, की आघाडी सरकारला शेतकऱ्यांचे देणं-घेणं नाही. कोकणातील शेतकरी चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झाला आहे. त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. राज्यात सोयाबीनचा जो पेरा झाला. त्यात खराब बियाणं शेतकऱ्यांना देण्यात आलं. यात 60 टक्के बियाणं उगवलं नाही. त्याचीही भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांसाठी विक्री व्यवस्था या सरकारने उभी करायला पाहिजे होती. पण, तशा प्रकारची कोणतीही व्यवस्था सरकारकडून करण्यात आली नाही. साडेबाराशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार मुकं आणि बहिरं झालं आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही शेतकऱ्यांची काळजी नाही. मी मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र, या सरकारकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याचा आरोप देखील सदाभाऊ खोत यांनी केला. Maharashtra Rain | मराठवाडा, विदर्भासह कोकणाला पावसानं झोडपलं; नदी, नाले तुडूंब

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget