एक्स्प्लोर

अमित शाहांमुळे चंद्रकांतदादांना मंत्रिपद: सामना

"चंद्रकांत पाटील यांचे भाजप अध्यक्ष अमित शाहांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळेच त्यांना महसूलमंत्रीपद मिळालं".

मुंबई:  ‘विकास गांडो थयो छे!’ म्हणजे ‘विकास वेडा झाला आहे, असं म्हणत कालच्या अग्रलेखातून भाजपवर वार करणाऱ्या शिवसेनेने आज 'सामना'तून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील यांचे भाजप अध्यक्ष अमित शाहांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळेच त्यांना महसूलमंत्रीपद मिळालं. शिवाय मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचं नाव चर्चेत असतं. मात्र मुख्यमंत्रीपदाची आशा बाळगणाऱ्या एकनाथ खडसेंचं काय झालं हे विसरु नका, असा टोला सामनातून लगावला आहे. शिवसेनेने सरकारविरोधी आंदोलन करुन स्वत:चं हसं करुन घेतलं. तसंच शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरुन शिवसेनेने चंद्रकांतदादांना टार्गेट केलं. ‘सामना’ अग्रलेखातील काही भाग जसाच्या तसा महागाईविरोधात आंदोलन केल्याने शिवसेनेचे हसे झाले असे जे म्हणतात त्यांची नाळ जनतेपासून तुटली आहे व सत्तेच्या नशेने त्यांचा ‘इक्बाल कासकर’ झाला आहे. कासकर हा ‘नशे’च्या फेऱयात सापडल्याने त्याला मागचे पुढचे काहीच आठवत नाही व तो असंबद्ध असे काहीतरी बडबडत असल्याचे पोलीस तपासात दिसत आहे. सत्तेच्या जहाल ‘खोपडी’ दारूने राज्यकर्त्यांच्या डोक्याची हातभट्टी झाल्यानेच त्यांना ‘महागाई’विरोधात आंदोलन करणारे मूर्ख, हास्यास्पद वाटत असावेत. ‘‘अच्छे दिन येणार, ते पहा आलेच आहेत’’ असे सांगून सत्तेत आल्यावरही ते ‘अच्छे दिन’ काही आलेच नाहीत. त्यामुळे मोदी सरकारचे घरोघरी हसू झाले आहे असे आम्ही बोललो तर पाटील यांची कळी खुलेल काय? शिवसेना फसवाफसवी करून सत्ता भोगीत नाही. शिवसेनेने सत्तेत राहून आंदोलने वगैरे करू नयेत असे चंद्रकांत पाटलांना वाटत असेल तर त्यांच्या सरकारने गोरगरीबांचे प्रश्न सोडवायला हवेत. जनतेचे आशीर्वाद आम्हांस आहेत, पण सरकारला ते पटत नसेल तर त्यांच्या डोक्याचा ‘गांडो थयो छे!’ बरोबर ना, चंद्रकांतदादा! विकास वेडा झाला दरम्यान कालच्या अग्रलेखातून शिवसेनेने विकासाच्या मुद्द्यावरुन जोरदार टोले हाणले होते. "गुजरातच्या विकासाचे काय झाले? असा सवाल करताच ‘विकास गांडो थयो छे!’ म्हणजे ‘विकास वेडा झाला आहे,’असे उत्तर आता गुजराती जनता देत आहे. फक्त गुजरातच कशाला, संपूर्ण देशभरातच ‘विकास गांडो थयो छे’ म्हणजे विकास वेडा झाल्याचे चित्र भारतीय जनता पक्षाचेच वरिष्ठ मंडळ समोर आणीत आहे", असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं होतं.   संबंधित बातम्या

हसं करुन घेतलेली शिवसेना सत्तेतून बाहेर पडूच शकत नाही : चंद्रकांत पाटील

विकास वेडा झाला आहे, 'सामना'तून टीकास्त्र यशवंत सिन्हांना पाठिंबा

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Embed widget