एक्स्प्लोर

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूशखबर आहे. कारण, अटी-शर्तींसह एसटी प्रवास शक्य आहे. आज यासाठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणी राहणाऱ्या चाकरमान्यांना एसटीने कोकणात प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी काही नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली.

अनिल परब यांच्या नेतृत्त्वाखाली कोकणातल्या आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीत गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात कसे जाणार? यावर चर्चा झाली. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार चाकरमान्यांना कोकणात सुखरुप पाठवणार आणि आणणार असं आश्वासन अनिल परब यांनी दिलं. तसंच कोकणातल्या चाकरमान्यांवरुन कोणीही राजकारण करु नये, असा टोलाही अनिल परब यांनी विरोधकांना लगावला.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, थकित वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर

काय आहेत नियम?

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लोकांना 10 दिवस क्वॉरंटाईन राहावं लागणार.
  • 12 ऑगस्टनंतर जे कोकणात जातील त्यांना कोरोना टेस्ट बंधनकार, चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर कोकणात जाण्यास परवानगी.
  • आज संध्याकाळी कोकणात जायला बुकिंग सुरू करण्यात येणार आहे.
  • एसटी 22 लोकांच्या ग्रुपने बुकिंग केलं तर मुंबईहून थेट गावी जाऊ शकतील. मात्र, जेवणासाठी एसटी बस थांबणार नाही, जेवण घेऊन जावं लागणार.
  • एसटीने जे जाणार त्यांना ई पास लागणार नाही. मात्र, एसटी शिवाय जे जाणार त्यांना इ पास घ्यावा लागणार आहे.
  • खासगी बसेसला एसटी पेक्षा दीडपट पैसे घेण्याचा अधिकार आहे, त्याशिवाय कोणी मागणी केली तर लोकांनी पैसे देऊ नये. कोणी अधिकचे पैसे आकारले तर कारवाई करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले.
  • दरवर्षी 2200 गाड्या जातात आम्ही 3 हजार गाड्याची तयारी ठेवली आहे. 12 तारखेपर्यंत जे जाणार त्यांना घरीच क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे.

क्वॉरटाईन कालावधीवरुन पुन्हा गोंधळ गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना क्वॉरटाईनच्या मुद्यावरुन मतमंतातरे असताना आता ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन स्थानिक पातळीवर 14 दिवसांचाच क्वॉरटाईन कालावधी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी चाकरमान्यांना 7 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. सात ऑगस्टपर्यंत तुम्ही या, चौदा दिवस क्वॉरटाईन व्हा आणि मगच गणेशोत्सव साजरा करा, असा नियम घालून दिला आहे. कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने तर 7 तारखेनंतर येणाऱ्या चाकरमान्यांना एक हजार रुपयांचा दंडच आकारला आहे. पाच ते दहा टक्के चाकरमान्यांनासाठी आम्ही पूर्ण गावातील लोकांच आरोग्य धोक्यात टाकू शकत नसल्याचं येथील सरंपचांच मत आहे. सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी 14 दिवस क्वॉरटाईन आणि उशिरा येणाऱ्यांना एक हजार दंड असा निर्णय आपण बैठकीत घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

Ganeshotsav 2020 | चाकरमान्यांबाबत आज मोठ्या निर्णयाची शक्यता

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : टीव्हीवर नेत्यांचा बोलबाला, पण सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंचीच क्रेझ; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही टाकले मागे
टीव्हीवर नेत्यांचा बोलबाला, पण सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंचीच क्रेझ; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही टाकले मागे
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील
आम्ही रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही; मुंबईत येतच असतो, मुंबईतील आंदोलन बंदीवरुन भडकले जरांगे पाटील

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
Embed widget